शहीद वीर बाबुराव शेडमाके यांना आदरांजली

By Admin | Updated: October 26, 2015 01:29 IST2015-10-26T01:29:24+5:302015-10-26T01:29:24+5:30

गोंडवाना गोटूल बहुउद्देशीय समिती गडचिरोलीच्या वतीने शहीद वीर बाबुराव शेडमाके यांचा शहीद दिन कार्यक्रम गोंडवन कला दालनात शुक्रवारी घेण्यात आला.

Shahid praises Baburao Shadmake | शहीद वीर बाबुराव शेडमाके यांना आदरांजली

शहीद वीर बाबुराव शेडमाके यांना आदरांजली

शहीद दिन : गोंडीधर्म ध्वजारोहण व रॅली; ऐतिहासिक लढ्याबाबत दिली माहिती
गडचिरोली : गोंडवाना गोटूल बहुउद्देशीय समिती गडचिरोलीच्या वतीने शहीद वीर बाबुराव शेडमाके यांचा शहीद दिन कार्यक्रम गोंडवन कला दालनात शुक्रवारी घेण्यात आला.
यावेळी आयटीआय चौकातील गोंडीयन पूजास्थळी आ. डॉ. देवराव होळी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. खा. अशोक नेते यांच्या हस्ते रॅलीला हिरवी झेंडी दाखवून रॅलीची सुरूवात करण्यात आली. राणी दुर्गावती चौक, बसस्थानकाजवळ महाराणी दुर्गावती यांच्या तैलचित्राला माल्यार्पण करण्यात आले. गोंडवन कला दालनात घेण्यात आलेल्या कार्यक्रमाचे उद्घाटन मोतिरावन कंगाली यांच्या हस्ते झाले. यावेळी शामकांत मडावी, डॉ. नामदेव उसेंडी, मनिरावण दुगा, आनंद मडावी, शामकांत मडावी, शालिक मानकर, पुष्पा कुमरे उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. नामदेव उसेंडी म्हणाले, वीर बाबुराव शेडमाके यांनी अल्प आयुष्यात देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी इंग्रजांविरोधात लढा दिला. परंतु काही स्वार्थी लोकांनी त्यांचा विश्वासघात केला, असे प्रतिपादन केले.
संचालन अशोक गावडे, प्रास्ताविक सुरेश किरंगे तर आभार वसंत पेंद्राम यांनी मानले. गुलाब मडावी, हरसिंग गोंड, गजानन टेकाम, सुंदर गावळे, नरेश आत्राम, वसंत पोरेटी, मनोज वालको, विठोबा मडावी, श्रीरंग नरोटे, सुधाकर वाळवे, कुसूम वाळवे, लक्ष्मी आतला, वच्छला नरोटे, संगीता किरंगे, अश्विनी गावडे, प्रतिभा मडावी, भरत येरमे, सदानंद ताराम, आनंद कंगाले, क्रांती केरामी, संदीप वरखडे, बंडू तिलगामे, लक्ष्मण कोवे उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Shahid praises Baburao Shadmake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.