छाया पोरेड्डीवार मातृत्व गौरव पुरस्काराने सन्मानित
By Admin | Updated: December 22, 2015 01:30 IST2015-12-22T01:30:22+5:302015-12-22T01:30:22+5:30
लोकसेवा आणि विकास संस्था चंद्रपूरच्या वतीने दिला जाणारा सुशीला दीक्षित स्मृती मातृत्व गौरव पुरस्कार छाया

छाया पोरेड्डीवार मातृत्व गौरव पुरस्काराने सन्मानित
गडचिरोली : लोकसेवा आणि विकास संस्था चंद्रपूरच्या वतीने दिला जाणारा सुशीला दीक्षित स्मृती मातृत्व गौरव पुरस्कार छाया अरविंद पोरेड्डीवार यांना केंद्रीय खत व रसायनमंत्री हंसराज अहीर यांच्या हस्ते शनिवारी देऊन चंद्रपूर येथे सन्मानित करण्यात आले.
सदर कार्यक्रमात स्व. यशवंतराव कुलकर्णी स्मृतिप्रीत्यर्थ प्रा. प्रभावती मुठाळ यांनाही मातृत्व गौरव पुरस्कार देण्यात आला. या कार्यक्रमाला माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री शांताराम पोटदुखे, गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन. व्ही. कल्याणकर उपस्थित होते.
या कार्यक्रमात बोलताना नामदार हंसराज अहीर म्हणाले की, लोकसेवा विकास संस्था राबवित असलेले उपक्रम कौतुकास्पद असून समाजात विधायक कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांचा सन्मान संस्था करते. पोरेड्डीवार कुटुंब हे सुसंस्कृत कुटुंब असून या परिवाराने समाजाच्या जडणघडणीत महत्त्वाचे योगदान देऊन सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व राजकीय वारसा सुसंस्कृतपणे जपण्याचे काम आजही करीत आहे, असे प्रतिपादन केले. (जिल्हा प्रतिनिधी)
४या प्रसंगी छाया अरविंद पोरेड्डीवार यांनी प्रा. प्रभावती मुठाळ संचालिका असलेल्या किलबिल या अनाथ आश्रमाला २५ हजार रूपयांची रोख आर्थिक मदत दिली.