साेनसरी येथे महिलांना शिवणकामाचे प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:42 IST2021-02-20T05:42:53+5:302021-02-20T05:42:53+5:30

कुरखेडा : उषा इंटरनॅशनल नवी दिल्ली अफार्म पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच स्पर्श संस्थेद्वारा संचालित उषा शिलाई स्कूलच्या ...

Sewing training for women at Saensari | साेनसरी येथे महिलांना शिवणकामाचे प्रशिक्षण

साेनसरी येथे महिलांना शिवणकामाचे प्रशिक्षण

कुरखेडा : उषा इंटरनॅशनल नवी दिल्ली अफार्म पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच स्पर्श संस्थेद्वारा संचालित उषा शिलाई स्कूलच्या माध्यमातून साेनसरी येेथे परिसरातील १० गरजू महिलांना निशुल्क शिवणकामाचे प्रशिक्षण देण्यात आले. काेसी, वासी, खापरी, चिचेवाडा, डाेंगरगाव, चिनेवाडा, नेहारपायली, नान्ही आणि साेनेरांगी आदी दहा गावातील प्रत्येकी एक गरीब व गरजू आदिवासी महिलांची मुलाखत घेऊन सात दिवसीय प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली. नागपूर येथील तांत्रिक मार्गदर्शक राजेश हटवार आणि वर्षा मत्ते यांनी प्रशिक्षण दिले. प्रशिक्षणानंतर महिला आपल्या गावात इतर महिलांना प्रशिक्षण देण्याचे काम करणार आहेत. या माध्यमातून इतर महिलांनासुद्धा राेजगाराची संधी मिळेल. प्रशिक्षणप्रसंगी माेनाली बाेरकर, प्रीतम लाेणारे, राहुल बारसागडे, नीतेश सिडाम यांनी सहकार्य केले. प्रशिक्षणाला स्पर्श संस्थेचे डाॅ. दिलीप बारसागडे, विनायक गारडे, परेश नागपुरे यांचे मार्गदर्शन लाभले.

Web Title: Sewing training for women at Saensari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.