नालीअभावी रस्त्यावरून वाहते सांडपाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:42 IST2021-09-15T04:42:18+5:302021-09-15T04:42:18+5:30

जाेगीसाखरा : आरमाेरी तालुक्यातील पिसेवडधा ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या येंगाडा येथे नालीचे बांधकाम झाले नसल्याने सांडपाणी रस्त्यावरून वाहते. त्यामुळे ...

Sewage flowing from the road due to lack of drainage | नालीअभावी रस्त्यावरून वाहते सांडपाणी

नालीअभावी रस्त्यावरून वाहते सांडपाणी

जाेगीसाखरा : आरमाेरी तालुक्यातील पिसेवडधा ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या येंगाडा येथे नालीचे बांधकाम झाले नसल्याने सांडपाणी रस्त्यावरून वाहते. त्यामुळे दुर्गंधीचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. येंगाडा येथील रामदास सयाम ते श्रावण सिडाम यांच्या शेतापर्यंत नाली बांधकाम आवश्यक हाेते. मात्र नाली बांधण्यात आली नाही. त्यामुळे या परिसरातील घरामधून निघणारे सांडपाणी बाराही महिने रस्त्यावरून वाहते. या सांडपाण्यातून नागरिकांना मार्ग काढावा लागत आहे.

फरशी असलेली बंद नाली बांधणे गरजेचे आहे. गावातील अरुंद रस्त्यावर नाल्यांचा अभाव आहे. अनेक नागरिकांची घरे असल्याने त्यांच्या घरापर्यंत अद्यापही नालीचे बांधकाम करण्यात आले नाही. त्यामुळे नागरिकांना येथून आवागमन करताना अडचणी येत आहेत. नाली बांधकाम करावे, अशी मागणी हाेत आहे.

Web Title: Sewage flowing from the road due to lack of drainage