कारसह सात लाखांचा मुद्देमाल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2017 23:16 IST2017-08-30T23:16:38+5:302017-08-30T23:16:50+5:30
मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखा गडचिरोेलीच्या पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचाºयांनी कुरखेडा तालुक्यातील कढोली येथे .....

कारसह सात लाखांचा मुद्देमाल जप्त
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोेली : मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखा गडचिरोेलीच्या पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचाºयांनी कुरखेडा तालुक्यातील कढोली येथे धाड टाकून तसेच देलनवाडी-मानापूर-पिसेवडधा मार्गावर रांगी येथे सापळा रचून कारसह एकूण ६ लाख ९४ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.
सदर कारवाई पोलिसांनी बुधवारी मध्यरात्री २ वाजताच्या सुमारास केली. याप्रकरणी विष्णू तक्तानी रा. कुरखेडा, वाहनचालक धमापाल देवटे, दीपक कैलास मानकर दोघेही राहणार कढोली ता. कुरखेडा यांचेवर आरमोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सदर आरोपीतर्फे या कारमधून देशी दारूची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी देलनवाडी, मानापूर, पिसेवडधा मार्गावरील रांगी येथे सापळा रचून कारला पकडले. कारची झडती घेतली असता, या कारमध्ये २ लाख ९४ हजार रूपये किंमतीची देशी दारू आढळून आली. तसेच पोलिसांनी ४ लाख रूपये किंमतीची कार जप्त केली. दारू व कार मिळून एकूण ६ लाख ९४ हजार रूपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. याप्रकरणातील तिन्ही आरोपींविरोधात महाराष्ट्र दारूबंदी कलम ५ (अ), ९८ (क), ८३ (अ) अन्वये बुधवारी पहाटेच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला. सदर कारवाई महिला पोलीस उपनिरीक्षक समु रामकिशोर चौधरी, पोलीस हवालदार नरेश सहारे, पोलीस नाईक उद्धव नरोटे, दुधराम चवारे, महिला पोेलीस शिपाई गुरूदास साखरे, चालक नाईक पोलीस शिपाई प्रशांत पातकमवार आदींनी केली. सदर कारवाईमुळे अवैध दारूविक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.