शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

नऊ गावातील दीडशे हेक्टर जमिनीला बसणार फटका

By admin | Updated: November 12, 2016 02:06 IST

तेलंगणा राज्यातील मेडिगट्टा-कालेश्वर सिंचन प्रकल्पामुळे सिरोंचा तालुक्यातील नऊ गावातील दीडशे हेक्टर

मेडिगड्डा-कालेश्वर सिंचन प्रकल्प : सिरोंचात जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जनसुनावणीसिरोंचा : तेलंगणा राज्यातील मेडिगट्टा-कालेश्वर सिंचन प्रकल्पामुळे सिरोंचा तालुक्यातील नऊ गावातील दीडशे हेक्टर जमिनीला फटका बसणार आहे. यामध्ये शासकीय व खासगी जमिनीचा समावेश आहे. दीडशेपैकी केवळ ५० हेक्टर जमीन या सिंचन प्रकल्पाने पाण्याखाली येणार आहे. मात्र या सिंचन प्रकल्पाने नऊ गावातील एकाही घराचे मुळीच नुकसान होणार नाही, अशी माहिती सिरोंचा तहसील कार्यालयात शुक्रवारी जिल्हाधिकारी ए. एस. आर. नायक यांच्या उपस्थित घेण्यात आलेल्या जनसुनावणीत देण्यात आली. मेडिगट्टा-कालेश्वर सिंचन प्रकल्पाच्या निर्मितीमुळे सिरोंचा तालुक्यातील शेतकरी व नागरिकांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून गैरसमज पसरले होते. सदर संभ्रम दूर करण्यासाठी शुक्रवारी जिल्हाधिकारी नायक यांच्या उपस्थितीत तहसील कार्यालयात जनसुनावणीची सभा सुरू करण्यात आली. यावेळी सभागृहात प्रचंड गर्दी होती. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी काही मोजक्या लोकांना आत बोलावून तहसीलदाराच्या सभागृहात त्यांची बैठक घेतली. मेडिगट्टा-कालेश्वर सिंचन प्रकल्पाचे पाणी मागच्या दिशेने (बॅक वॉटर) ५० किमी अंतरापर्यंत जाणार असून सदर पाणी नदीपात्रात राहणार असल्याने नऊ गावाच्या जमिनीला फटका बसणार आहे. यामध्ये पोचमपल्ली, वडधम, आईपेठा, तूमनूर, पेंटीपाका, आरडा, मृदूक्रिष्णापूर, लंबडपल्ली आदी गावांचा समावेश आहे. सदर नऊ गावातील कमीतकमी जमीन पाण्याखाली जावी, असा आमचा प्रयत्न आहे, अशी माहिती सिंचन प्रकल्पाशी संबंधित अभियंत्यांनी यावेळी लोकांना दिली. सिंचन प्रकल्पाचे एक मीटरपर्यंत खालच्या भागात बांधकाम राहणार. नंतर १० मीटर उंचीपर्यंत गेट राहणार आहेत. त्यामुळे बॅक वॉटरची समस्या उद्भवणार नाही. नदी पात्रात चार किमी पर्यंतचा बांध राहणार असून पाणी पातळी रेतीपासून १२ मीटर राहणार आहे. सदर सिंचन प्रकल्पामुळे नऊ गावातील २०० सर्वे नंबरधारकांची जमीन पाण्याखाली येणार आहे. मात्र यात तीन गावांचे सर्वात जास्त जमीन पाण्याखाली येणार असून सहा गावांना फारसा फटका बसणार नाही, अशी माहिती जिल्हाधिकारी नायक व सिंचन प्रकल्पाचे तेलंगणा येथील मुख्य अभियंते व्यंकटेश्वरलू यांनी यावेळी दिली.येत्या काही दिवसात कोणत्या शेतकऱ्यांच्या किती जमिनी जाणार हे शेतकऱ्यांच्या नावासह तहसील कार्यालय व त्या-त्या ग्रामपंचायतीच्या कार्यालयात नोटीस बोर्डावर लावण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. यापूर्वी नदीच्या पूरामुळे ज्या शेतकऱ्यांच्या शेतजमिनी वाहून गेले आहेत, सध्या तिथे जमिनी नाहीत. परंतु सातबारावर तशी नोंद असल्यास त्या वाहून गेलेल्या जमिनीचे सुध्दा या सिंचन प्रकल्पामुळे नुकसान होत असल्यास त्यांना नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. नुकसान भरपाई देताना शासकीय दर न लावता शेतकऱ्यांशी चर्चा करून जे खासगी बाजारभाव राहतील, त्यानुसार मोबदला दिला जाईल, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. यावेळी अधीक्षक अभियंता सुधाकर रेड्डी, ओंकार सिंग, सुरेश कुमार, टी. सुरेश, सिरोंचाचे तहसीलदार अशोक कुमरे आदी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)