लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : राष्ट्रीय लोकअदालतीच्या माध्यमातून जिल्हाभरातील १०१ प्रलंबित व दाखलपूर्व खटले आपसी तडजोडीने निकाली काढण्यात आले. यातून ६४ लाख ७३ हजार ५९२ रूपयांची वसुली करण्यात आली.प्रलंबित खटले निकाली काढण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार गडचिरोली जिल्ह्यातील न्यालयांमध्ये ८ डिसेंबर रोजी तडजोडीस पात्र दिवाणी व फौजदारी मामले तसेच इतर मामल्यांकरिता राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष सुरेंद्र आर. शर्मा, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव डी. जी. कांबळे यांच्या देखरेखीखाली लोक न्यायालयाचे आयोजन करण्यात आले होते. पॅनल क्रमांक १ वर जिल्हा न्यायाधीश वर्ग १ तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. एम. मेहरे, पॅनल क्रमांक २ वर दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) तथा मुख्य न्यायदंडाधिकारी बी. एम. पाटील, पॅनल क्रमांक ३ वर सह दिवाणी न्यायाधीश एन. सी. बोरफडकर यांनी काम पाहिले.लोक न्यायालय यशस्वी करण्यासाठी जिल्हा वकील संघ, न्यायालयीन कर्मचारी तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
तडजोडीने १०१ खटले निकाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2018 22:22 IST
राष्ट्रीय लोकअदालतीच्या माध्यमातून जिल्हाभरातील १०१ प्रलंबित व दाखलपूर्व खटले आपसी तडजोडीने निकाली काढण्यात आले. यातून ६४ लाख ७३ हजार ५९२ रूपयांची वसुली करण्यात आली.
तडजोडीने १०१ खटले निकाली
ठळक मुद्देराष्ट्रीय लोकअदालत : ६४ लाख ७३ हजार रूपयांची वसुली