शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

समस्याग्रस्त लोकांची सेवा करणार; डॉक्टर झालेल्या आदिवासी मुलीची इच्छा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2020 7:21 PM

माडिया जमातीमधील पहिली महिला डॉक्टर होण्याचा बहुमान मिळवणा-या या मुलीचे नाव आहे डॉ. कोमल मडावी.

गडचिरोली : इयत्ता चौथीपर्यंत ज्या मुलीला मराठीसुद्धा धड समजत नव्हते, ती आदिवासी समाजातील अतिमागास अशा माडिया जमातीतील मुलगी एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण करून डॉक्टर झाली आहे. माडिया जमातीमधील पहिली महिला डॉक्टर होण्याचा बहुमान मिळवणा-या या मुलीचे नाव आहे डॉ. कोमल मडावी. आपल्या लेकीची ही झेप तिच्या आई-वडिलांसाठीच नाही तर संपूर्ण समाजासाठी अभिमानाची बाब ठरली आहे.‘ज्या लोकांमध्ये मी लहानपणापासून राहिले, त्यांच्या आरोग्यविषयक समस्या, अडचणी जवळून पाहिल्या तेच लोक माझ्या डॉक्टर होण्यामागील प्रेरणास्थान आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी आरोग्य सेवा देणे हेच माझे ध्येय आहे,’ अशी स्पष्ट भावना डॉ. कोमलने ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.नुकत्याच लागलेल्या एमबीबीएस अंतिम वर्षाच्या निकालात कोमल उत्तीर्ण झाल्यानंतर समाजातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्याचा स्वीकार करत सोमवारी (दि.२४) ती आपल्या गावावरून इंटर्नशिपसाठी यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे रवाना झाली. यादरम्यान ‘लोकमत’शी भ्रमणध्वनीवर संवाद साधत डॉ.कोमलने आपल्या आतापर्यंतच्या प्रवासाला उजाळा दिला.गडचिरोलीपासून २०० किलोमीटरवर सिरोंचा तालुक्यात असलेल्या झिंगानूर या छोटाशा गावात कोमल तिसरीपर्यंत शिकली. गावात माडिया जमातीचे लोक, तीच बोलीभाषा आणि शिकवणारे शिक्षकही माडिया भाषेतूनच बोलणारे. त्यामुळे मराठीसुद्धा धड कळत नव्हते. अशात आरोग्य सेविका असलेली आई श्यामला मडावी यांची बदली सिरोंचा येथे झाली. त्यामुळे कोमलचे दहावीपर्यंतचे शिक्षण सिरोंचात सुरू झाले. जिद्द, हुशारी आणि व्यवसायाने शेतकरी असलेले व कमी शिक्षित असतानाही मुली शिकल्या पाहीजे म्हणून प्रोत्साहन देणारे कोमलचे वडील कासा मडावी यांच्या हिंमतीमुळे कोमल नागपूरला शिकायला गेली.  सरकारी होस्टेलमध्ये राहून बारावीपर्यंत शिक्षण घेऊन कोमलने एमबीबीएसची प्रवेश पात्रता परीक्षाही उत्तीर्ण केली. आता यवतमाळच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून तिने हा अभ्यासक्रम पूर्ण केला.गडचिरोली जिल्ह्याच्या दुर्गम, आदिवासीबहुल आणि नक्षलवादाने पीडित भागात खासगी वैद्यकीय सेवा मिळणे तर दूर, सरकारी रुग्णालयेही डॉक्टरांअभावी ओस पडलेली असतात. त्यामुळे या भागातील लोकांची वैद्यकीय सेवेत मोठी आबाळ होते. या वंचितांना योग्य ती वैद्यकीय सेवा देण्याचा डॉ.कोमलचा मानस आहे. एमबीबीएसनंतर एमएस (मास्टर इन सर्जरी) हा पदव्युत्तर अभ्यासक्रम करण्याचीही इच्छा असल्याचे तिने लोकमतशी बोलताना सांगितले.लहान बहीणही होतेय डॉक्टरकोमलपाठोपाठ तिची लहान बहीण पायल हीसुद्धा डॉक्टर होत आहे. ती नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसच्या द्वितीय वर्षात शिकत आहे. आई-वडिलांचे प्रोत्साहन आणि स्वत:मध्ये चिकाटी असेल तर दुर्गम भागातील मुलीही उच्च शिक्षण घेऊन करीअर घडवू शकतात, हेच कोमल व पायलने दाखवून दिले आहे.