दीड हजार रुग्णांना सेवा

By Admin | Updated: February 11, 2015 02:05 IST2015-02-11T02:05:53+5:302015-02-11T02:05:53+5:30

स्थानिक उपजिल्हा रुग्णालयाच्या वतीने दुर्गम भागात आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले. या आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून दीड हजार रुग्णांवर उपचार करण्यात आले.

Service to one and a half thousand patients | दीड हजार रुग्णांना सेवा

दीड हजार रुग्णांना सेवा

अहेरी : स्थानिक उपजिल्हा रुग्णालयाच्या वतीने दुर्गम भागात आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले. या आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून दीड हजार रुग्णांवर उपचार करण्यात आले.
गडचिरोली जिल्ह्यात खासगी रुग्णालयांची संख्या अत्यंत नगण्य आहे. त्यातही दुर्गम व ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्यसेवा मिळत नाही. रस्त्यांची सुविधा नसल्याने प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल होणे शक्य होत नाही. ही बाब लक्षात घेऊन अहेरी उपजिल्हा रुग्णालयाच्या वतीने असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले. आरोग्य शिबिरामध्ये रक्तदाब, मधुमेह, कर्करोग, हृदयरोग, पक्षघात आदी रूग्णांना शोधून त्यांची तपासणी करून समुपदेशन व औषधोपचार करण्यात आले.
उपजिल्हा रूग्णालयाच्या कक्षेत येत असलेल्या मोसम, नंदीगाव, रामय्यापेठा, येदरंगा, व्यंकटरावपेठा, अवलमारी, गेडसेगुडम, रामनगट्टा, व्यंकटापुर, हत्तीगाव, नरसिंहापल्ली, पेरमिली, जिमलगट्टा, असरअल्ली, विठ्ठलरावपेठा आदी गावांमध्ये शेकडो आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले. सदर शिबिर वैद्यकीय अधीक्षक डॉ. कन्ना मडावी यांच्या मार्गदर्शनात डॉ. प्रियंका गेडाम, समुपदेशक मनीषा कांचनवार, अधिपरिचारिका कीर्ती आत्राम, डॉ. मनीषा मडावी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ शुभांगी वाळके, डाटाएन्ट्री आॅपरेटर, महेंद्र बांदूरकर आदींनी केले. पोलीस विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जनजागरण मेळाव्यातही या शिबिरांचे आयोजन करण्यात आले. आरोग्य शिबिरापूर्वी जनजागृती केली जात असल्याने नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत होता. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Service to one and a half thousand patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.