सर्व्हर डाऊन, ई-पॉस मशीन ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2019 06:00 AM2019-12-14T06:00:00+5:302019-12-14T06:00:22+5:30

डिसेंबर महिना सुरू झाल्यानंतर स्वस्त धान्य दुकानदारांनी मालाची उचल करून लाभार्थ्यांना धान्य वाटपास सुरूवात केली. गेल्या १० दिवसांपासून ई-पॉस मशीनचा सर्वर डाऊन झाल्यामुळे राशन वितरणाचे काम अत्यल्प वेळ चालत आहे. एका दुकानदाराला दिवसभराची फुरसत करून एक ते दोन ग्राहक करण्यासाठी एक ते दीड तासाचा वेळ लागत आहे. परिणामी दुकानासमोर लाभार्थ्यांची गर्दी होत असते.

Server down, e-pos machine jam | सर्व्हर डाऊन, ई-पॉस मशीन ठप्प

सर्व्हर डाऊन, ई-पॉस मशीन ठप्प

Next
ठळक मुद्देलाभार्थ्यांसह दुकानदारही त्रस्त : स्लोे नेटवर्क व लिंक फेलमुळे रेशन वितरणात अडचणी

विलास चिलबुले ।
लोकमत न्यूज नेटवर्क
आरमोरी : स्वस्त धान्य दुकानामार्फत होणाऱ्या रेशन धान्य वितरण व्यवस्थेत पारदर्शकता यावी या उद्देशाने ई-पॉस या बायोमेट्रिक प्रणालीचा वापर गडचिरोली जिल्ह्यासह राज्यभरात सुरू आहे. परंतु गडचिरोली जिल्ह्यात ई-पॉस मशीनचे सर्व्हर वारंवार डाऊन होत आहे. तसेच स्लो नेटवर्कमुळे लिंक फेल होऊन रेशन वितरणात अडचणी येत आहेत. परिणामी लाभार्थ्यांसह स्वस्त धान्य दुकानदारही त्रस्त झाले आहेत.
डिसेंबर महिना सुरू झाल्यानंतर स्वस्त धान्य दुकानदारांनी मालाची उचल करून लाभार्थ्यांना धान्य वाटपास सुरूवात केली. गेल्या १० दिवसांपासून ई-पॉस मशीनचा सर्वर डाऊन झाल्यामुळे राशन वितरणाचे काम अत्यल्प वेळ चालत आहे. एका दुकानदाराला दिवसभराची फुरसत करून एक ते दोन ग्राहक करण्यासाठी एक ते दीड तासाचा वेळ लागत आहे. परिणामी दुकानासमोर लाभार्थ्यांची गर्दी होत असते.
अनेकदा उद्भवणाऱ्या तांत्रिक दोषामुळे लाभार्थ्यांना धान्य वितरणात अडचणी येत असून बऱ्याच ठिकाणी राशन दुकानदार व लाभार्थ्यांमध्ये किरकोळ वाद होत आहेत. गरीब कुटुंबांना पुरेसे अन्न मिळावे, त्यांची उपासमार होऊ नये यासाठी शासनाने अशा गरीब व सर्वसामान्य कुटुंबासाठी स्वस्त दरात राशन उपलब्ध करून देण्याची योजना अंमलात आणली. गरीब कुटुंबांना स्वस्त दरात धान्य उपलब्ध करून दिले जाते.
राशन धान्य वितरण व्यवस्थेत वापरण्यात येत असलेल्या ई-पॉस मशीनमध्ये तांत्रिक अडचणी येत असल्यामुळे धान्य वितरणाचे काम जेवढ्या गतीने व्हायला पाहिजे, तसे होताना दिसून येत नाही. परिणामी स्वस्त धान्य दुकानदारांचाही बराच वेळ जात आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन सदर समस्या मार्गी लावावी, अशी मागणी दुकानदारांसह धान्य उचलणाºया लाभार्थ्यांनी केली आहे.
ग्राहक व दुकानदारांकडून पंचायत समितीच्या पुरवठा विभागाला यासंदर्भात अनेक तक्रारी प्राप्त झाल्या. मात्र ई-पॉॅस मशीनबाबतच्या तांत्रिक समस्या मार्गी लावण्यात आल्या नाही. धान्य वितरण व्यवस्था अधूनमधून बंद पडत आहे. बायोमेट्रिक प्रणालीच्या वापरात सुरूवातीला खूप अडचणी आल्या होत्या.


१,१९६ दुकानात मशीन, वाटपाचे वेळापत्रक ढासळले
गडचिरोली जिल्ह्याच्या बाराही तालुक्यात मिळून एकूण १ हजार १९६ इतके स्वस्त धान्य दुकान आहेत. या सर्व दुकानांमध्ये पॉर्इंट आॅफ सेल म्हणजे ई-पॉस मशीन बसविण्यात आल्या आहेत. मात्र अहेरी उपविभागासह दुर्गम भागात तसेच आरमोरी, कुरखेडा तालुक्यात बीएसएनएलसह खासगी कंपन्यांचे नेटवर्क राहत नसल्याने या बायोमेट्रिक प्रणालीत अडचणी येत आहेत. परिणामी काही वेळा आॅफलाईन जुन्या पद्धतीने धान्य वाटप केले जाते.

Web Title: Server down, e-pos machine jam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.