निर्व्यसनी राहून सेवा द्या!

By Admin | Updated: February 9, 2017 01:39 IST2017-02-09T01:39:44+5:302017-02-09T01:39:44+5:30

दारू, खर्रा या व्यसनांमुळे बुद्धिमान मानव व्यसनांच्या आहारी जात आहे. आपण आपल्या कार्यालयात सेवा

Serve and live! | निर्व्यसनी राहून सेवा द्या!

निर्व्यसनी राहून सेवा द्या!

बीडीओंचे प्रतिपादन : सिरोंचात ग्रामसेवकांची आढावा बैठक
सिरोंचा : दारू, खर्रा या व्यसनांमुळे बुद्धिमान मानव व्यसनांच्या आहारी जात आहे. आपण आपल्या कार्यालयात सेवा देताना निर्व्यसनी राहून सेवा दिली तर जनतेचे चांगले कार्य होईल, असे प्रतिपादन संवर्ग विकास अधिकारी एस. के. खिराळे यांनी मंगळवारी केले.
स्थानिक पंचायत समिती सभागृहात ग्रामसेवक ग्रामविकास अधिकाऱ्यांची आढावा बैठक बीडीओ एस. के. खिराळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी मुक्तिपथ अभियानाचे तालुका संघटक किशोर मलेवार, विस्तार अधिकारी जी. बी. माकडे, एस. आर. कडूकर उपस्थित होते.
सिरोंचा तालुक्यात तंबाखूमुक्त गाव व तंबाखुक्त शाळा गठित करण्यात आल्या असल्याची माहिती मलेवार यांनी दिली. यावेळी आर. एम. बोरकुटे, एम. एल. मेश्राम, जी. डी. मडावी, पी. डी. प्रधान, पी.एम. बोदेले, एम. सी. वाळके, मोगरकर, मडावी, संजय गेडाम, बांबोळे, बायवसे, दासारी, सल्ला, मोहुर्ले, परचाके, तुमळाम, मडावी, पगाडे, उईके, मेश्राम, धकाते, चहांदे, नैैताम, कोल्हटकर, नरोटी, आलाम, कोरेटी, गोन्नाडे, बेघेल, एस. एन. नैैताम, दोनाडकर हजर होते. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Serve and live!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.