दुचाकी अपघातात दाेघे गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:38 IST2021-04-02T04:38:31+5:302021-04-02T04:38:31+5:30
पतीराम मनीराम तुलावी (वय १९, रा. चारवाही ता. धानोरा) व सुनील भरणे (वय ३४, रा. मालेवाडा) अशी जखमींची नावे ...

दुचाकी अपघातात दाेघे गंभीर
पतीराम मनीराम तुलावी (वय १९, रा. चारवाही ता. धानोरा) व सुनील भरणे (वय ३४, रा. मालेवाडा) अशी जखमींची नावे आहेत.
पतीराम हा गडचिरोली येथील साई अलायमेंट येथे कामावर होता. तो होळीकरिता आपल्या गावी गेला होता. आपल्या गावाहून गडचिरोली येथे जात होता. तर सुनील हा धानोरा येथून मालेवाडा येथे जात होता. जपतलाई गावाजवळ दोन्ही दुचाकींची समोरासमोर धडक झाली. या धडकेत सुनीलचे पाय व हात मोडले तर पतीरामचे पाय मोडले आहेत. दोघांनाही धानोरा ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर सुनीलला नागपूर येथे नेण्यात आले तर पतीरामवर धानोरा येथे उपचार सुरू होते. दोन्ही दुचाकी पोलीस मदत केंद्र येरकड येथे जमा करण्यात आल्या आहेत.