दोन खटल्यांमध्ये दोघांना शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2019 06:00 IST2019-09-08T06:00:00+5:302019-09-08T06:00:33+5:30
दुसऱ्या प्रकरणात गडचिरोली तालुक्यातील बामणी येथील अमोल ज्ञानेश्वर उंदीरवाडे याने १६ जून २०१७ रोजी फिर्यादीला अश्लिल भाषेत शिविगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. फिर्यादीच्या तक्रारीवरून गडचिरोली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलीस निरिक्षक संजय सांगळे यांच्या मार्गदर्शनात सहायक फौजदार सुरेश घोडाम यांनी केला.

दोन खटल्यांमध्ये दोघांना शिक्षा
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : दोन वेगवेगळ्या खटल्यांमध्ये दोन आरोपींना न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे.
गडचिरोली येथील गोकुलनगर वार्डातील पवन बालाजी दुर्योधन याने २६ मार्च २०१८ रोजी फिर्यादीने चाकून वार करून दुखापत केली. फिर्यादीने याबाबतची तक्रार केल्यानंतर गडचिरोली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. तत्कालीन ठाणेदार दीपरत्न गायकवाड यांच्या मार्गदर्शनात सहायक फौजदार सुनील बेसरकर यांनी तपास करून दोषारोपत्र न्यायालयात दाखल केले. ७ सप्टेंबर रोजी आरोपी विरोधात सबळ पुरावे आढळल्याने प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी एन. पी. वासाडे यांनी आरोपी पवन दुर्योधन याला कलम ३२४ अन्वये दोषी ठरवून दोन वर्षांचा सश्रम कारावास व एक हजार रुपये द्रव्य दंडाची शिक्षा सुनावली. द्रव्य दंड न भरल्यास दोन महिने साध्या कारावासाची शिक्षा व फिर्यादीस चार हजार रुपये भरपाई देण्याचा आदेश सुनावला.
सरकारी पक्षातर्फे सरकारी अभियोक्ता महाजन यांनी काम पाहिले. कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून पोलीस हवालदार यशवंत मलगाम, कोर्ट मोहरर सुभाष सोरते यांनी काम पाहिले.
दुसऱ्या प्रकरणात गडचिरोली तालुक्यातील बामणी येथील अमोल ज्ञानेश्वर उंदीरवाडे याने १६ जून २०१७ रोजी फिर्यादीला अश्लिल भाषेत शिविगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. फिर्यादीच्या तक्रारीवरून गडचिरोली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलीस निरिक्षक संजय सांगळे यांच्या मार्गदर्शनात सहायक फौजदार सुरेश घोडाम यांनी केला. आरोपीविरोधात दोषारोपपत्र दाखल केले. आरोपीविरोधात न्यायायाला सबळ साक्षपुरावे आढळल्याने ७ सप्टेंबर रोजी आरोपीला न्यायालयाने एक हजार रुपये द्रव्य दंडाची शिक्षा व कोर्ट संपेपर्यंत उभे राहण्याची शिक्षा दिली. दंड न भरल्यास पाच दिवसांच्या साध्या कारावासाची शिक्षा दिली. सरकारी पक्षातर्फे सहायक सरकारी अभियोक्ता अमर फुलझेले यांनी काम पाहिले. कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून पोलीस हवालदार यशवंत मलगाम, कोर्ट मोहरर सुभाष सोरते यांनी जबाबदारी सांभाळली.
आरोपींमध्ये दहशत
मागील दोन वर्षात खटल्यांचे निकाल लागण्याचे प्रमाण वाढले आहे. तसेच आरोपींना शिक्षा सुध्दा होत आहे. त्यामुळे ज्या आरोपींची प्रकरणे न्यायालयात प्रलंबित आहेत. अशा आरोपींमध्ये दहशत निर्माण झाले आहे. आपल्यालाही शिक्षा होईल, अशी भिती त्यांच्यामध्ये निर्माण झाली आहे.