७ फेब्रुवारीला ज्येष्ठ सदस्यांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:52 IST2021-02-05T08:52:07+5:302021-02-05T08:52:07+5:30
गडचिराेली : ज्येष्ठ नागरिक संस्था, गडचिराेलीची दहावी वार्षिक सर्वसाधारण सभा दिनांक ७ फेब्रुवारी राेजी दुपारी १२ वाजता आरमाेरी मार्गावरील ...

७ फेब्रुवारीला ज्येष्ठ सदस्यांचा सत्कार
गडचिराेली : ज्येष्ठ नागरिक संस्था, गडचिराेलीची दहावी वार्षिक सर्वसाधारण सभा दिनांक ७ फेब्रुवारी राेजी दुपारी १२ वाजता आरमाेरी मार्गावरील मंगल कार्यालयात हाेणार आहे. या सभेत ७५ वर्षांवरील विशेष ज्येष्ठ सदस्यांचा सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष डी. एन. बर्लावार, सचिव देवाजी साेनटक्के यांनी शनिवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
या पत्रकार परिषदेला संस्थेचे उपाध्यक्ष पी. एस. घाेटेकर, विनायक खांदेशकर, आर. टी. राऊत, सी. बी. आवळे व इतर सदस्य उपस्थित हाेते. संस्थेच्या नवीन कार्यकारी मंडळाची निवडणूक घेण्यात येणार आहे. यासाठी दिनांक ३ फेब्रुवारीपर्यंत निवडणूक अधिकारी ॲड. नितीन कामडी यांच्याकडे अर्ज सादर करता येणार आहे. दिनांक ५ फेब्रुवारीला उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे. कार्यकारी मंडळाची निवडणूक बिनविराेध व्हावी, असा विद्यमान मंडळाचा मानस असल्याचे पदाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.
संस्थेचे हक्काचे कार्यालय व सभागृह तसेच विरंगुळा केंद्र गडचिराेली येथे तयार झाले असून, या संस्थेच्यावतीने विविध उपक्रम घेतले जातात. संस्थेचे सद्यस्थितीत ८५० सदस्य आहेत. या सर्व सदस्यांनी रविवारी होणाऱ्या सभेला वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.