पेसा गावातील विकास कामांचे प्रस्ताव पाठवा
By Admin | Updated: June 24, 2016 02:00 IST2016-06-24T02:00:22+5:302016-06-24T02:00:22+5:30
पेसा क्षेत्रांतर्गत मोडत असलेल्या गावांमध्ये मुलभूत विकास कामे करण्यासाठी ग्रामसभेचा ठराव घेऊन सदर प्रस्ताव शासनाला सादर करावा,

पेसा गावातील विकास कामांचे प्रस्ताव पाठवा
आढावा बैठक : राज्यपालांच्या उपसचिवांचे जिल्हा प्रशासनाला निर्देश
गडचिरोली : पेसा क्षेत्रांतर्गत मोडत असलेल्या गावांमध्ये मुलभूत विकास कामे करण्यासाठी ग्रामसभेचा ठराव घेऊन सदर प्रस्ताव शासनाला सादर करावा, असे आवाहन राज्यपालांचे उपसचिव परिमल सिंह यांनी केले.
बैठकीला जिल्हाधिकारी ए. एस. आर. नायक, मुख्य कार्यकारी अधिकारी शंतनू गोयल, उपवनसंरक्षक लक्ष्मी अनबत्तुला, सहायक जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, अतिरिक्त जिल्हाधिकारी महेश आव्हाड उपस्थित होते.
वनहक्क अधिनियन २००६ व पंचायत क्षेत्र विस्तार विकास कामाचा आढावा गुरूवारी जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आला. यावेळी मार्गदर्शन करताना उपसचिव परिमल सिंह बोलत होते. बैठकीदरम्यान जिल्ह्यात वन विभाग, महसूल विभाग, आदिवासी विकास विभाग व जिल्हा परिषद यांच्या मार्फतीने राबविण्यात आलेल्या विविध योजनांचा आढावा त्यांनी घेतला. अपूर्ण प्रस्ताव तातडीने पूर्ण करून ते सादर करण्याचे निर्देश दिले. पेसा अंतर्गतची गावे मागासली आहेत. या गावांच्या विकासासाठी मूलभूत सोयीसुविधा निर्माण करणे आवश्यक आहे. त्यामुळे याबाबतचा प्रस्ताव तयार करून शासनाला सादर करावा, पेसा अंतर्गत मोडणाऱ्या गावांमध्ये सीमांकन करून ते प्रस्ताव पाठवावे, असे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. (नगर प्रतिनिधी)