सिराेंचा तालुक्यात सरपंच-उपसरपंचांची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 05:08 IST2021-02-18T05:08:58+5:302021-02-18T05:08:58+5:30
पातागुडम ग्रामपंचायतीमध्ये सरपंचपदी सुजाता यलम, तर उपसरपंचपदी अशोक गुमडी यांची निवड करण्यात आली. यावेळी प्रेम मिच्चा, समक्का वासम, भाजपचे ...

सिराेंचा तालुक्यात सरपंच-उपसरपंचांची निवड
पातागुडम ग्रामपंचायतीमध्ये सरपंचपदी सुजाता यलम, तर उपसरपंचपदी अशोक गुमडी यांची निवड करण्यात आली. यावेळी प्रेम मिच्चा, समक्का वासम, भाजपचे कार्यकर्ते संदीप कोरेत, पुलगम चंद्रशेखर व ग्रामस्थ उपस्थित होते. या ग्रा. पं.वर भाजपने वर्चस्व मिळविले.
गोल्लगुड्डम ग्रा. पं.वर राष्ट्रवादी काॅंग्रेसने वर्चस्व मिळविले. सरपंचपदी श्रीदेवी येल्लम, तर उपसरपंच म्हणून विजयलक्ष्मी लेंडगुरी यांची निवड करण्यात आली. यावेळी कमलेश आसम, बापू गावडे व नागमणी टेकाम उपस्थित हाेते.
आसरअल्ली ग्रामपंचायतीवर आविसंने झेंडा राेवला. या ग्रामपंचायतीमध्ये सरपंचपदी रमेश तैनेनी यांची अविरोध निवड करण्यात आली. यावेळी पूजा पिरला, रोहिनी चपीडी, सर्वेराव गुडुरी, शिवकुमार कंडेला, रवली गिरणी, क्रिष्णवेणी गुंडे, सहीद बापू, कलाम शेख, सुधाकर मिसरी, आदी उपस्थित हाेते.