शहरं
Join us  
Trending Stories
1
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
2
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा
3
“मुंबईच्या गरब्यात सेलिब्रिटींवर लाखोंची उधळण, तेच पैसे शेतऱ्यांना दिले असते”: रोहित पाटील
4
तोंडात कुरकुरे अन् निपचित पडलेला मृतदेह; कोर्टातून फरार झालेल्या आरोपीचा चिमुकलीवर अत्याचार
5
मुंबई-पुण्यात घरांच्या विक्रीत १७% घट; 'या' कारणांमुळे ग्राहकांनी फिरवली पाठ; किमती कमी होणार का?
6
‘आयुष्मान भारत’ योजना बंद पडली? नागपूरच्या रुग्णालयांमध्ये उघडकीस आले धक्कादायक वास्तव; रुग्णांना सेवा नाकारल्या
7
Video - "देवाने हे नियम बनवले नाहीत..."; शॉर्ट्स घालून महिलेने मंदिरात प्रवेश केल्याने मोठा गोंधळ
8
VIDEO: 'पॉवर हिटिंग'! ३ वर्षांच्या चिमुरड्याची बॅटिंग पाहून तुम्हीही म्हणाल- What a Shot!
9
मृत्यूचे कुंड : १०० हून अधिक लोकांना गायब करणारी रहस्यमयी विहीर! ४० मीटर लांब, शास्त्रज्ञांनाही उलगडेना...
10
आशिया चषकातील वादानंतर हवाई दल प्रमुखांचा मोठा दावा; भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली 
11
कोजागरी शरद पौर्णिमा २०२५: पंचकाची अशुभ छाया अन् अमंगल काळ, शुभ मुहूर्त कधी? लक्ष्मी लाभेल!
12
"मी आभार मानतो, त्यांनी माझे 1000 रुपये वाचवले...!"; फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंची खिल्ली उडवली, नेमकं काय म्हणाले?
13
Dombivli Crime: मोबाईलचा पासवर्ड बदलला, कुटुंबात राडा! आई, दोन्ही मुले, आजोबामध्ये तुंबळ हाणामारी
14
अमानुष! लेकीशी भांडण... सासरच्यांनी जावयाला विष पाजलं, पळवून पळवून मारलं; झाला मृत्यू
15
२०२७ पर्यंत ५ राशींना साडेसाती, प्रदोषात ‘हे’ करावे; पंचक कायमचे टळेल, शनि शुभ-कल्याण करेल!
16
आंध्र प्रदेशात देवरगट्टू बन्नी उत्सवादरम्यान दोन जणांचा मृत्यू, ९० जण जखमी
17
Video: छातीत झाडल्या तीन गोळ्या, मित्राच्या हत्येचा बनवला व्हिडीओ; पोलिसांची उडाली झोप
18
हव्वा अन् धुव्वा...! महिंद्रा थार फेसलिफ्ट लाँच! हे दोन मुख्य बदल, ग्राहकांची मागणी ऐकली..., दोन नवे रंग...
19
Crime: 'मी तुमच्या मुलीची हत्या केलीये'; मित्रासोबत रुमवर गेली अन् निळ्यामध्ये ड्रममध्ये...; तरुणीची हत्या का केली?
20
Neena Kulkarni: ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुलकर्णी यांना मानाचे विष्णुदास भावे गौरव पदक जाहीर!

बियाणे घ्यायचे की, मोबाईल?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2020 05:01 IST

जिल्ह्यात सध्या खरिपाची कामे जोमाने सुरु आहेत. पेरणी योग्य पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकरी कामाला लागले आहे. तर दुसरीकडे ऑनलाईन शिक्षणावर भर दिल्या जात असल्याने विद्यार्थी पालकांकडे मोबाईल घेऊन देण्यासंदर्भात मागणी करीत आहेत. या मागणीमुळे मात्र पालकांना विद्यार्थ्यांच्या भविष्याची काळजी पडली आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांना चिंता : आॅनलाईन शिक्षणाला ग्रामीण विद्यार्थी मूकणार

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी शाळा सुरू होण्यासंदर्भात शासनस्तरावर अद्यापही ठोस निर्णय झाला नाही. असे असले तरी काही शाळांनी ऑनलाईन शिकवणी सुरु केली आहे. शहरी भागातील बहुतांश विद्यार्थी या माध्यमातून शिक्षण घेत असले तरी, ग्रामीण भागात सध्या पेरणीची वेळ असल्याने अ‍ॅन्ड्राईड मोबाईल घ्यायचा की, बियाणे असा प्रश्न सध्या शेतकरी कुटुंब विचारत आहे.जिल्ह्यात सध्या खरिपाची कामे जोमाने सुरु आहेत. पेरणी योग्य पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकरी कामाला लागले आहे. तर दुसरीकडे ऑनलाईन शिक्षणावर भर दिल्या जात असल्याने विद्यार्थी पालकांकडे मोबाईल घेऊन देण्यासंदर्भात मागणी करीत आहेत. या मागणीमुळे मात्र पालकांना विद्यार्थ्यांच्या भविष्याची काळजी पडली आहे.कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादूर्भावामुळे यावर्षी प्रथमच परीक्षा न घेता निकाल घोषित करण्यात आला. दरवर्षी २६ जूनला शाळेची घंटा वाजायची. यावर्षी मात्र ती कधी वाजणार यासंदर्भात अद्यापही शासनस्तरावर निर्णय झाला नाही. आता काही शाळांनी विद्यार्थ्यांना ऑनलाईन धडे देण्याचा उपक्रम सुरू केला आहे. त्यामुळे ज्यांच्याकडे अ‍ॅन्ड्राईड मोबाईल नाही, अशा विद्यार्थ्यांना मात्र अभ्यास कसा करायचा असा प्रश्न पडला आहे.शासनाने विद्यार्थ्यांना मोबाईल, टॅब द्यावाशहरातील बहुतांश इंग्रजी शाळा संचालकांनी ऑनलाईन अभ्यासक्रमावर भर दिला आहे. परंतु बºयाच पालकांकडे मोबाईल नाही. यातच अ‍ॅन्ड्राईड मोबाईल घ्यावा तरी कसा, असा प्रश्न पालकांना पडला आहे. विशेष म्हणजे, ग्रामीण भागात पाहिजे तसे नेटवर्क मिळत नाही आणि मिळाले तरी डाटा रिचार्जकरिता पैसे लागतात. त्यामुळे शासनाने एकतर मोबाईल किंवा टॅब मोफत द्यावे किंवा ऑफलाईन शिक्षण द्यावेत, अशी मागणी पालकांकडून केली जात आहे. दुसरीकडे कोरोनामुळे बहुतांश पालकांचा रोजगार गेला. त्यामुळे काही पालकांनी गावाला जाणे पसंत केले आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांचे काय, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन धडे देण्याचे शासन नियोजन करीत आहे, त्या सर्व विद्यार्थ्यांना अ‍ॅन्ड्राईल मोबार्ईल किंवा मुंबईतील शाळांच्या धर्तीवर विद्यार्थ्यांना टॅब देऊन विद्यार्थ्यांची अडचण सोडवावी तसेच पालकांचा ताप काही प्रमाणात कमी करावा, अशी मागणीही आता केली जात आहे.ग्रामीण भागात वर्क फ्राम होमचा फज्जालॉकडाऊमुळे शहरीभागातील बहुतांश नोकरदार गावाकडे परत आले आहे. तर दुसरीकडे ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांची आर्थिक स्थिती चांगली आहे त्यांच्याकडे अ‍ॅन्ड्राईड मोबाईल आहे. मात्र नेटवर्क सुविधा नसल्याने त्यांनाही त्रास सहन करावा लागत आहे. त्यातच आता शेतीची कामे असल्यामुळे पूर्णवेळ शेतात राबावे लागते, अनेकवेळा शेतकरी आपल्या मुलाबाळांनाही शेतात नेतात. त्यामुळे सध्यातरी ग्रामीण भागातील विद्यार्थी आॅनलाईन शिक्षणाकडे वळणार नसल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे, कोरोनाचे रुग्ण ग्रामीण भागाच्या तुलनेमध्ये शहरी भागात जास्त प्रमाणात आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील शाळा सुरू करून विद्यार्थ्यांचे हित जपण्याची मागणीही केली जात आहे.ग्रामीण भागातील विद्यार्थी मागे पडण्याची भितीआॅनलाईन शिकविण्यासंदर्भात आता प्रशासकीय स्तरावरूनही विचार केला जात आहे. मात्र ग्रामीण भागातील स्थिती बघता, यामध्ये ते विद्यार्थी पुन्हा मागे पडतील, असे मत शिक्षकतज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. ग्रामीण भागातील बहुतांश पालकांकडे अ‍ॅन्ड्राईड मोबाईल नाही. त्यातच ज्यांच्याकडे मोबाईल आहे तिथे काही ठिकाणी नेटवर्कचा प्राब्लेम असल्यामुळे ग्रामीण विद्यार्थी येथे मागे पडण्याची भिती व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे, अन्यवेळी छोटे-मोठे प्रशिक्षण देऊन शिक्षकांना अपडेट ठेवणारा शिक्षण विभाग यासंदर्भात अद्यापतरी बोलण्यास तयार नाही.

टॅग्स :Educationशिक्षण