वीजतारा जाेडताना सुरक्षारक्षक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:31 IST2021-05-03T04:31:26+5:302021-05-03T04:31:26+5:30
दयालुराम झाइराम भक्ता (४५, रा. मुरूमगाव) असे मृतक व्यक्तीचे नाव आहे. मृतक हा मुरुमगाव येथे विद्युत वितरण कार्यालयात सिक्युरिटी ...

वीजतारा जाेडताना सुरक्षारक्षक ठार
दयालुराम झाइराम भक्ता (४५, रा. मुरूमगाव) असे मृतक व्यक्तीचे नाव आहे. मृतक हा मुरुमगाव येथे विद्युत वितरण कार्यालयात सिक्युरिटी गार्ड म्हणून कार्यरत होता. तसेच तो वीज दुरुस्तीची कामे सुद्धा करायचा. घटनेच्या दिवशी ओव्हरलोड ट्रकला विजेचे तार अडकून तुटले. तुटलेले तार जोडण्याकरिता मृतक हा खांबावर चढला. तार जोडत असताना त्याचा स्पर्श जिवंत विद्युत तारांना झाल्याने त्याला जोरदार विजेचा धक्का बसला. व तो खांबावरून खाली पडला. डोक्याला जबर मार बसला. उपचाराकरिता धानोरा ग्रामीण रुग्णालयात आणले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घाेषित केले. सदर मृतक हा सिक्युरिटी गार्डचे काम करत असताना विजेची तार जोडण्याकरिता खांबावर चढलात कसा हा हे संशोधनाचा विषय आहे. याबद्दल मुरूमगाव येथील अभियंता तसेच धानोरा येथील मुख्य अभियंता शेंडे यांना फोनवरून विचारणा करण्याचा प्रयत्न केला असता दोघांनीही प्रतिसाद दिला नाही. तालुक्यात अनेक गावांत लाइनमनमध्ये राहत नाही. लाईट गेली असता गावातीलच नागरिक दुरुस्ती करण्याचा प्रयत्न करतात. त्यातूनच अशा घटना घडतात. मुख्यालयी न राहणाऱ्या वीज कर्मचाऱ्यांवर काेणतीही कारवाई केली जात नसल्याने त्यांची हिम्मत वाढत चालली आहे.