दुसऱ्या टप्प्यात ग्रा.पं.निवडणुकीत बिनधास्तपणे सुरू आहे प्रचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:30 IST2021-01-14T04:30:36+5:302021-01-14T04:30:36+5:30

गडचिराेली : जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात गडचिराेली, धानाेरा, आरमाेरी, देसाईगंज, कुरखेडा, काेरची या सहा तालुक्यामध्ये १५ जानेवारी राेजी मतदान प्रक्रिया ...

In the second phase, the campaign is going on without any hesitation | दुसऱ्या टप्प्यात ग्रा.पं.निवडणुकीत बिनधास्तपणे सुरू आहे प्रचार

दुसऱ्या टप्प्यात ग्रा.पं.निवडणुकीत बिनधास्तपणे सुरू आहे प्रचार

गडचिराेली : जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात गडचिराेली, धानाेरा, आरमाेरी, देसाईगंज, कुरखेडा, काेरची या सहा तालुक्यामध्ये १५ जानेवारी राेजी मतदान प्रक्रिया घेण्यात येणार आहे. उर्वरित सहा तालुक्यात दुसऱ्या टप्प्यात २० जानेवारी राेजी मतदान हाेणार आहे. मात्र ग्रामीण भागात आता काेराेनाची भीती राहिली नसून निवडणुकीच्या प्रचारात कुणीही घाबरत नसल्याचे दिसून येते. पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीचा प्रचार बिनधास्तपणे सुरू आहे.

देसाईगंज तालुक्याच्या विसाेरा येथे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या प्रचाराला वेग आला आहे. येथे दाेन दिवस उमेदवारांनी रॅली काढली. या रॅलीत १०० च्या आसपास लाेक सहभागी झाले हाेते. मतदान मागण्यासाठीही २० ते २५ लाेक एका घरी जात असल्याचे दिसून येते. चामाेर्शी तालुक्याच्या आष्टी येथे ६ ते ७ व काही ठिकाणी १० ते १२ नागरिक प्रचार करण्यासाठी एका घरी जात असल्याची माहिती आहे. अहेरी तालुक्याच्या कमलापूर येथे चार पॅनल एकमेकापुढे उभे ठाकले आहेत. चार ते पाच लाेक मतदाराच्या घरी जाऊन भेट घेत आहेत. एकूणच काेराेनाची भीती उरली नाही.

बाॅक्स...

आष्टी ग्रामपंचायत

आष्टी ग्रामपंचायतीमध्ये सदस्यांच्या १५ जागांसाठी २० जानेवारी राेजी मतदान प्रक्रिया घेण्यात येणार आहे. येथे ४२ उमेदवार रिंगणात असून कोरोनाची भीती न बाळगता जोमाने आणि सभा घेऊन प्रचार केला जात आहे.

बाॅक्स...

विसाेरा ग्रामपंचायत

या ग्रामपंचायतीत १३ जागांसाठी ३० उमेदवार रिंगणात आहेत. दाेन पॅनल लढत असून २६ उमेदवार आहेत आणि चार उमेदवार अपक्षरीत्या नशीब अजमावित आहेत. सर्वच उमेदवारांनी बुधवारपर्यंत जोरदार प्रचार केला.

बाॅक्स...

कमलापूर ग्रामपंचायत

कमलापूर ग्रा.पं.मध्ये ९ जागांसाठी २७ उमेदवार रिंगणात आहेत. येथे चार पॅनल असून तीन प्रभागात प्रचार केला जात आहे. सर्वच उमेदवारांनी मतदारांच्या घरी जाऊन गाठीभेटी घेऊन मतदान करण्याचे साकडे घातले आहे.

बाॅक्स...

काेराेना संसर्गाची भीती उरली नाही

गडचिराेली जिल्ह्यात दाेन टप्प्यात ग्रामपंचायती निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया घेण्यात येणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील उमेदवारांचा प्रचार वेगात आला आहे. प्रचारादरम्यान उमेदवार तसेच कार्यकर्ते व त्यांच्या कुटुंबीयांना काेराेना संसर्गाची भीती उरली नसल्याचे दिसून येते. लाेक बिनधास्त हाेऊन वावरत आहेत.

Web Title: In the second phase, the campaign is going on without any hesitation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.