दुसऱ्या टप्प्यात २६ गोदरीमुक्त गावांची होणार पाहणी

By Admin | Updated: September 18, 2016 01:47 IST2016-09-18T01:47:34+5:302016-09-18T01:47:34+5:30

गडचिरोली जिल्हा परिषदेने १२ तालुक्यातून ५१ ग्रामपंचायतीचे प्रस्ताव गोदरीमुक्त गावासाठी पाठविले आहे

In the second phase 26 villages will be surveyed | दुसऱ्या टप्प्यात २६ गोदरीमुक्त गावांची होणार पाहणी

दुसऱ्या टप्प्यात २६ गोदरीमुक्त गावांची होणार पाहणी

गोंदियाची चमू जिल्ह्यात दाखल : राज्यस्तरावर घेतला जात आहे आढावा
गडचिरोली : गडचिरोली जिल्हा परिषदेने १२ तालुक्यातून ५१ ग्रामपंचायतीचे प्रस्ताव गोदरीमुक्त गावासाठी पाठविले आहे. सदर गावांची पाहणी करण्यासाठी राज्यस्तरीय चमूंकडून निरिक्षणाचे काम सुरू झाले आहे. पहिल्या टप्प्यात नागपूर जिल्ह्याच्या काटोल पंचायत समितीच्या चमूने २५ गावांची पाहणी केली. त्यानंतर शुक्रवारपासून उर्वरित २६ गावांची पाहणी करण्यासाठी गोंदिया जिल्ह्यातील राज्यस्तरीय चमू गडचिरोली जिल्ह्यात दाखल झाली आहे. या चमूच्या सदस्यांनी गडचिरोली पंचायत समिती अंतर्गत वाकडी, येवली आणि मुडझा या तीन गावांची शनिवारी पाहणी केली.
या राज्यस्तरीय समितीमध्ये अध्यक्ष म्हणून ज्ञानेश्वर पटले, संचालक म्हणून अशोक बेलेकर तर सदस्यांमध्ये संजा पटले, शारदा कावळे, विशाल मेश्राम यांचा समावेश आहे. शनिवारी सदर समितीने वाकडी, येवली, मुडझा गावाला भेटी देऊन पाहणी केली. यावेळी गडचिरोली जिल्ह्यातून गडचिरोलीचे संवर्ग विकास अधिकारी व्ही. यू. पचारे, जि.प.चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सी. के. मम्मी, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक अमित माणूसमारे, गडचिरोलीचे पंचायत विस्तार अधिकारी रतन शेंडे, ए. बी. बोपनवार तसेच प्रफुल्ल मडावी, अमित पुंडे, शैलश ढवस, सदानंद धुडसे, रोशन पडोळे, प्रदीप बरई, प्रकाश चौधरी, नादिया शेख, संजली कांबळे आदी उपस्थित होते. यावेळी समितीच्या सदस्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधून स्वच्छतेबाबत चर्चा केली. (स्थानिक प्रतिनिधी)

तीन गावांत दिली समितीने भेट
गोंदिया जिल्ह्याच्या सदर राज्यस्तरीय चमूतील सदस्यांनी वाकडी, येवली, मुडझा या गावांना भेटी देऊन तेथील वैयक्तिक शौचालय, सार्वजनिक शौचालय, बांधकामाची पाहणी केली. परिसर स्वच्छता, सांडपाणी, घनकचरा व्यवस्थापन, शाळा, अंगणवाडी शौचालय तसेच पिण्याच्या पाण्याची सुविधा आणि वैयक्तिक स्वच्छता आदी बाबींची पाहणी करून निरिक्षण केले. सदर समितीमार्फत राज्य शासनाकडे गोदरीमुक्तीबाबतचा अहवाल सादर करण्यात येणार आहे.

Web Title: In the second phase 26 villages will be surveyed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.