३० ला आयटकचे दुसरे जिल्हास्तरीय अधिवेशन

By Admin | Updated: April 27, 2017 01:20 IST2017-04-27T01:20:15+5:302017-04-27T01:20:15+5:30

आशा गटप्रवर्तक अंगणवाडी सेविका, शालेय पोषण आहार कर्मचारी हातपंप देखभाल दुरूस्ती कामगार, वीज मंडळातील कामगार,

The second district level session of Etak in 30th | ३० ला आयटकचे दुसरे जिल्हास्तरीय अधिवेशन

३० ला आयटकचे दुसरे जिल्हास्तरीय अधिवेशन

गडचिरोली : आशा गटप्रवर्तक अंगणवाडी सेविका, शालेय पोषण आहार कर्मचारी हातपंप देखभाल दुरूस्ती कामगार, वीज मंडळातील कामगार, ग्रामरोजगार सेवक यांच्या विविध मागण्यांवर चर्चा करण्यासाठी तसेच शासनस्तरावर पाठपुरावा करण्यासाठी ३० एप्रिलला स्थानिक गोंडवन कलादालनात आयटकचे दुसरे जिल्हास्तरीय अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनात संबंधितांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयटकच्या वतीने करण्यात आले आहे.
जिल्हास्तरीय अधिवेशनात आयटकचे राज्याध्यक्ष सुकुमार दामले, राज्य सचिव श्याम काळे, अंगणवाडी, बालवाडी युनियनच्या राज्य सरचिटणीस अ‍ॅड. माधुरी क्षीरसागर, राज्य कार्यकारिणी सदस्य डॉ. महेश कोपुलवार मार्गदर्शन करणार आहेत. आयटकशी संलग्न सर्व युनियन, आशा व गटप्रवर्तक, अंगणवाडी सेविका, शालेय पोषण आहार कर्मचारी, हातपंप दुरूस्ती कामगार, वीज मंडळातील कामगार, ग्रामरोजगार सेवकांनी अधिवेशनाला उपस्थित राहावे, ३० ला सकाळी ११ वाजता इंदिरा गांधी चौकातून महारॅली काढली जाईल, अशी माहिती आयटकचे जिल्हा सचिव विनोद झोडगे, जिल्हाध्यक्ष देवराव चवळे, अमोल मारकवार, जगदीश मेश्राम, वर्कर फेडरेशनचे बी. के. नाकतोडे, जलीलखॉ पठाण, रजनी गेडाम, कुंदा चालिलवार, ज्योती कोमलवार, गणेश मातेरे यांनी केले आहे. (शहर प्रतिनिधी)

Web Title: The second district level session of Etak in 30th

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.