सलग दुसऱ्या दिवशी काेराेनाने दाेघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 05:00 AM2021-04-05T05:00:00+5:302021-04-05T05:00:28+5:30

एकूण बाधितांची संख्या १० हजार ९७७ एवढी झाली आहे. तर१० हजार २६८ जणांनी काेराेनावर मात केली आहे. सध्या ५७६ सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. एकूण ११५ जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३.७१ टक्के, सक्रिय रुग्णांचे प्रमाण ५.२५ टक्के तर मृत्यूदर १.०५ टक्के झाला.

For the second day in a row, Kareena died of scars | सलग दुसऱ्या दिवशी काेराेनाने दाेघांचा मृत्यू

सलग दुसऱ्या दिवशी काेराेनाने दाेघांचा मृत्यू

Next
ठळक मुद्दे१११ नवीन बाधितांची भर; मृतांमध्ये आलापल्ली व गडचिराेतील रूग्णांचा समावेश

लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : रविवारी पुन्हा १११ काेराेना रुग्णांची भर पडली आहे तर ६८ जणांनी काेराेनावर मात केली आहे. आलापल्ली येथील ६० वर्षीय महिला तर गडचिरोली येथील ७७ वर्षीय पुरुषाचा काेराेनामुळे मृत्यू झाला आहे. काेराेना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ हाेत आहे. त्यामुळे काेराेना साथीवर नियंत्रण ठेवण्याची कसरत प्रशासनाला करावी लागणार आहे. 
एकूण बाधितांची संख्या १० हजार ९७७ एवढी झाली आहे. तर१० हजार २६८ जणांनी काेराेनावर मात केली आहे. सध्या ५७६ सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. एकूण ११५ जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३.७१ टक्के, सक्रिय रुग्णांचे प्रमाण ५.२५ टक्के तर मृत्यूदर १.०५ टक्के झाला.
नवीन बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील नवेगाव १०, शिवाजीनगर १, कारगिर चौक १, ओमनगर १, लांजेडा ६, त्रिमूर्ती चौक १, कॉम्पलेक्स २, रामनगर २, झेडपी क्वॉर्टर १, जेप्रा १, चामोर्शी रोड २, वसा २, गोकुलनगर २, गोगांव १, आंबेशिवनी १, शाहूनगर १, मेडिकल कॉलनी २, आशीर्वादनगर १, सीआरपीएफ कॅम्प १, होंडा शोरुमजवळ १, लक्ष्मीनगर १,हनुमान वाॅर्ड १, स्थानिक १, राजगाट्टा १, बोदली १, अहेरी तालुक्यातील नागेपल्ली ४, आलापल्ली ३, स्थानिक २,महागांव २, आरमोरी तालुक्यातील स्थानिक २, कुरखेडा तालुक्यातील स्थानिक ३, मुलचेरा तालुक्यातील भवानीपूर १, चामोर्शी तालुक्यातील स्थानिक ४, घारगांव १, रेगडी ३, धानोरा तालुक्यातील स्थानिक १, कोरची तालुक्यातील स्थानिक १, पोलीस कॅम्प कोटगुल १, भामरागड तालुक्यातील स्थानिक १३, एलबीपी हेमलकसा ६, झारेगुडा १, सिरोंचा तालुक्यातील सुधागुडम १, नेमाडा २, तर वडसा तालुक्यातील बाधितांमध्ये एम. जी. विद्यालय १, स्थानिक ४, गांधी वाॅर्ड १, सिंधी कॉलनी १, कुरुड ३, आमगांव ४, विसोरा १, तर इतर जिल्ह्यातील बाधितांमध्ये १ जणांचा समावेश आहे.
काेराेनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली असल्याचे दिसून येत आहे.
 

गडचिराेली तालुक्यात ४६ रुग्णांची भर 
नवीन १११ बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील ४६, अहेरी १०, आरमोरी २, भामरागड तालुक्यातील २०, चामोर्शी ८, धानोरा तालुक्यातील १, कोरची २, कुरखेडा ३, मुलचेरा १, सिरोंचा ३, तर देसाईगंज तालुक्यातील १५ जणांचा समावेश आहे. तर आज कोरोनामुक्त झालेल्या ६८ रुग्णांमध्ये गडचिरोलीमधील ४२, अहेरी ८, आरमोरी ४, भामरागड १, चामोर्शी ३, धानोरा १, एटापल्ली १, सिरोंचा १, कुरखेडा ३, तर देसाईगंज तालुक्यातील ४ जणांचा समावेश आहे.

 

Web Title: For the second day in a row, Kareena died of scars

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.