दुसऱ्याही दिवशी सराफा व्यापार ठप्प

By Admin | Updated: March 4, 2016 01:26 IST2016-03-04T01:26:10+5:302016-03-04T01:26:10+5:30

केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी नुकत्याच सादर केलेल्या अर्थसंकल्पात सोना, चांदीच्या व्यवसायावर एक टक्का अबकारी कर लागू करण्याचे जाहीर केले आहे.

On the second day the bullion trade jumped | दुसऱ्याही दिवशी सराफा व्यापार ठप्प

दुसऱ्याही दिवशी सराफा व्यापार ठप्प

व्यापाऱ्यांचे आंदोलन सुरूच : शासनाच्या धोरणाचा निषेध; उलाढालीवर परिणाम
गडचिरोली/अहेरी/देसाईगंज : केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी नुकत्याच सादर केलेल्या अर्थसंकल्पात सोना, चांदीच्या व्यवसायावर एक टक्का अबकारी कर लागू करण्याचे जाहीर केले आहे. या निर्णयाच्या विरोधात अहेरी, आलापल्ली, भामरागड, सिरोंचा, एटापल्ली, मुलचेरा, देसाईगंज तालुक्यासह गडचिरोली जिल्हा मुख्यालयातील सराफा व्यावसायिकांनी गुरूवारीही आपली प्रतिष्ठाने बंद ठेवून शासनाचा निषेध केला आहे. परिणामी जिल्ह्यातील सराफा व्यावसायिकांची कोट्यवधींची उलाढाल थांबली आहे.
केंद्र सरकारने सोने, चांदीच्या व्यवसायावर एक टक्का अबकारी कर लागू करण्याची घोषणा केली असून आता अबकारी विभागाचे अधिकारी व्यावसायिकांना त्रास देतील हे ओळखून सराफा असोसिएशनच्या वतीने शासनाच्या या निर्णयाचा विरोध करीत आंदोलन सुरू करण्यात आले आहे. गडचिरोली जिल्हा मुख्यालयातही सराफा असोसिएशनच्या वतीने आंदोलन सुरू करण्यात आले आहे. आंदोलनात जिल्हा असोसिएशनचे अध्यक्ष रत्नाकर बोगोजुवार, उपाध्यक्ष नंदू वाईलकर, सचिव नितीन हर्षे, कोषाध्यक्ष नितीन चिमड्यालवार, शहर असोसिएशनचे अध्यक्ष गजानन यनगंधलवार, उपाध्यक्ष सुधाकर बोगोजुवार, सचिव सुरेश भोजापुरे, सुधाकर यनगंधलवार, सचिन हर्षे, सुनील हर्षे, जगन्नाथ पाटील, संजय हर्षे, श्रीकांत डोमळे, नरेंद्र बोगोजुवार, कुमोद बोबाटे, चंदू वाईलकर, मारोती भांडेकर, कुणाल नागरे, शिवाजी पवार, मनसूर सेठ, जगदीश डोमळे, संजय देवोजवार, अविनाश विश्रोजवार आदी सराफा व्यावसायिक सहभागी झाले आहेत.
अहेरी येथे आंदोलन सुरू केले असल्याची माहिती अहेरी-आलापल्ली ज्वेलर्स संघटनेचे अध्यक्ष प्रकाश पालकुर्तीवार, सचिव विवेक चेलीयालवार यांनी लोकमतला दिली. तीन दिवस दुकाने बंद ठेवल्यानंतर शासनाकडून काहीच निर्णय न झाल्यास सराफा प्रतिष्ठाने बेमुदत बंद ठेवण्याचा इशारा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. आंदोलनात सुरेश कवीराजवार, देविदास जक्कोजवार, विजय मल्लेलवार, संजय चिमड्यालवार, महेश कविराजवार, प्रविण कुंदोजवार, रवी जंगमवार, दिलीप कविराजवार, महादेव साळुंखे, दिवाकर उपलवार, संतोष कविराजवार, श्रीकांत श्रीरामवार, तिरूपती श्रीरामवार, महेश श्रीरामवार, हसनभाई, इरशादभाई, शेखर बांगरे, दिलीप जाधव, संतोष गदेपाकवार, सदानंद कोलेजवार, व्यंकटेश गदेपाकवार आदीसह बहुसंख्य सराफा व्यावसायीक सहभागी झाले आहेत. गडचिरोली, आरमोरी शहरातील सराफा व्यावसायिकांनी आंदोलन पुकारले असून आपली प्रतिष्ठाने बंद ठेवून केंद्र शासनाचा निषेध नोंदविला आहे. या आंदोलनाला अहेरी येथील सराफा व्यापाऱ्यांनी पाठिंबा दर्शविला.
देसाईगंज शहरातही सराफा व्यावसायिकांनी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवून शासनाच्या धोरणाचा निषेध केला. प्रतिष्ठाने बंद असल्यामुळे ग्राहकांना त्रास झाला.

Web Title: On the second day the bullion trade jumped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.