बिनागुंडात पोहोचले भामरागडचे एसडीपीओ
By Admin | Updated: February 12, 2017 01:26 IST2017-02-12T01:26:33+5:302017-02-12T01:26:33+5:30
भामरागड तालुक्यातील अत्यंत दुर्गम भाग व नक्षलवाद्यांचा गड समजल्या जाणाऱ्या बिनागुंडा येथे भामरागडचे उपविभागीय पोलीस अधिकारी

बिनागुंडात पोहोचले भामरागडचे एसडीपीओ
रमेश मारगोनवार भामरागड
भामरागड तालुक्यातील अत्यंत दुर्गम भाग व नक्षलवाद्यांचा गड समजल्या जाणाऱ्या बिनागुंडा येथे भामरागडचे उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांच्या नेतृत्वात भामरागड पोलीस मतदान विषयक जनजागृती करण्यासाठी या भागात पोहोचलेत.
नक्षलवाद्यांचा गड व संवेदनशील भाग मानल्या जाणाऱ्या बिनागुंडा परिसराला भामरागडचे उपविभागीय अधिकारी संदीप गावित यांच्या नेतृत्वात भामरागडच्या पोलिसांच्या पथकाने नुकतीच भेट दिली. यावेळी त्यांनी या भागातील नागरिकांना आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत निर्भयपणे मतदान करण्याचे आवाहन केले. आपल्या गावाच्या सर्वांगिण विकासासाठी मतदान करणे आवश्यक आहे. नक्षलवाद्यांच्या भूलथापांना बळी न पडता, नागरिकांनी लोकशाही व्यवस्था मजबूत करण्यासाठी यंत्रणेला सहकार्य करावे, असे आवाहन गावित यांनी यावेळी केले. या परिसरात साधारणत: अधिकारी जात नाही. मात्र पोलीस प्रशासनाने येथे गावभेटी देऊन तेथील नागरिकांशी संवाद साधला. यावेळी विनोबा भावे आश्रमशाळेच्या प्रांगणात ग्रामस्थांसह विद्यार्थीही उपस्थित होते.
गावातील ज्येष्ठ नागरिकांशीही पोलीस दलाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी चर्चा केली. त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. यावेळी गावित यांच्या समावेत सी-६० पथकाचे पोलीस उपनिरिक्षक राजेश खांडवे, पोलीस उपनिरिक्षक (क्यूआरटी) राजरतन खैरनार आदी उपस्थित होते. अलिकडेच भामरागड तालुक्यातील कोठी येथेही राज्याचे पोलीस महानिरिक्षकांनीही भेट दिली.