शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

परीक्षेच्या तोंडावर शालेय पोषण आहाराच्या धान्याचा पुरवठा

By admin | Updated: February 26, 2016 01:44 IST

शनिवार १३ फेब्रुवारीपूर्वी जिल्ह्याच्या आरमोरी व अहेरी तालुक्यातील शाळांमध्ये शालेय पोषण आहाराच्या धान्याचा तुटवडा निर्माण झाला होता.

सोमवारपासून प्रारंभ : शासनाकडून उशिरा मिळाली मुदतवाढगडचिरोली : शनिवार १३ फेब्रुवारीपूर्वी जिल्ह्याच्या आरमोरी व अहेरी तालुक्यातील शाळांमध्ये शालेय पोषण आहाराच्या धान्याचा तुटवडा निर्माण झाला होता. परिणामी अनेक शाळांमध्ये सदर पोषण आहार शिजला नाही. शाळा मुख्याध्यापक व पालकांकडून ओरड सुरू झाल्यानंतर दि विदर्भ को-आॅपरेटीव्ह मार्केटिंग फेडरेशनच्या वतीने १५ फेब्रुवारी सोमवारपासून जिल्ह्याच्या बाराही तालुक्यात शालेय पोषण आहाराच्या धान्याचा पुरवठा सुरू करण्यात आला आहे.जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने एटापल्ली तालुक्याला १७४.४० मेट्रिक टन तांदळाची मागणी करण्यात आली. मुलचेरा तालुक्याला ४७३.४७ मेट्रिक टन, धानोरा तालुक्याला ३.६० मेट्रिक टन, देसाईगंज तालुक्यातील शाळांना २४८.७२ मेट्रिक टन, कोरची तालुक्यातील शाळांना ११०.८७ मेट्रिक टन, गडचिरोली तालुक्यातील शाळांना ३८.६६२ मेट्रिक टन व आरमोरी तालुक्यातील शाळांसाठी ६.७५ मेट्रिक टन तांदळाची मागणी करण्यात आली. शिक्षण संचालक, प्राथमिक शिक्षक संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या वतीने को-आॅपरेटीव्ह मार्केटींग फेडरेशन लिमिटेडला शालेय पोषण आहार योजनेंतर्गत तांदूळ व इतर धान्याच्या मालासाठी ४ फेब्रुवारी २०१६ रोजी मुदतवाढ देण्यात आली. सदर मुदतवाढ मिळण्यापूर्वीच अहेरी, आरमोरीसह काही तालुक्यातील शाळांमध्ये तांदूळ व धान्यादी मालाचा तुटवडा निर्माण झाला. तर काही शाळांमध्ये यापूर्वी पुरविण्यात आलेल्या शिल्लक मालाचा वापर शालेय पोषण आहार शिजविण्यासाठी केला जात आहे. इयत्ता पहिली ते पाचवी व सहावी ते आठवी वर्गाच्या विद्यार्थ्यांची शालेय परीक्षा मार्च महिन्यात घेण्यात येणार आहे. आता या वर्गातील विद्यार्थ्यांचा परीक्षेचा काळ आला आहे. शासन व प्रशासनाच्या दुर्लक्षितपणामुळे शाळांमधील पोषण आहार योजनेतील धान्य व धान्यादी मालाचा साठा संपल्यानंतरही या मालाचा पुरवठा करण्यात आला नाही. अध्या जिल्ह्यात धान्य व इतर मालासाठी ओरड सुरू झाल्यानंतर प्रशासनाने धान्य व इतर मालाचा पुरवठा सुरू केला आहे. (प्रतिनिधी)