शिष्यवृत्ती घोटाळ्यात दिगांबर मेंडकेला पुन्हा अटक
By Admin | Updated: August 11, 2015 02:04 IST2015-08-11T02:04:07+5:302015-08-11T02:04:07+5:30
येथील आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयांतर्गत बोगस महाविद्यालयांना प्रवेशक्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना

शिष्यवृत्ती घोटाळ्यात दिगांबर मेंडकेला पुन्हा अटक
गडचिरोली : येथील आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयांतर्गत बोगस महाविद्यालयांना प्रवेशक्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वाटप करण्यात आली. या प्रकरणात तत्कालीन प्रकल्प अधिकारी दिगांबर मेंडके याला पुन्हा गडचिरोली पोलिसांनी अटक केली आहे. मेंडके यांच्याविरूध्द सात प्रकरणात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. गडचिरोली जिल्हा सत्र न्यायालयाने त्यांचा जामिन रद्द केला. त्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली. ११ आॅगस्ट रोजी चामोर्शी न्यायालयासमोर मेंडके यांना पोलीस हजर करण्यात येणार आहे, अशी माहिती शिष्यवृत्ती घोटाळ्याचे तपास अधिकारी पोलीस निरिक्षक रवींद्र पाटील यांनी दिली आहे.
(प्रतिनिधी)