शिष्यवृत्तीची परीक्षा आता २३ मे राेजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:37 IST2021-04-04T04:37:35+5:302021-04-04T04:37:35+5:30

ही परीक्षा २५ एप्रिल राेजी निश्चित करण्यात आली हाेती. मात्र काेराेनाचे रूग्ण वाढत असल्याने आताच परीक्षा घेणे धाेक्याचे ठरू ...

Scholarship examination now on 23rd May | शिष्यवृत्तीची परीक्षा आता २३ मे राेजी

शिष्यवृत्तीची परीक्षा आता २३ मे राेजी

ही परीक्षा २५ एप्रिल राेजी निश्चित करण्यात आली हाेती. मात्र काेराेनाचे रूग्ण वाढत असल्याने आताच परीक्षा घेणे धाेक्याचे ठरू शकते ही बाब लक्षात घेऊन आता ही परीक्षा २३ मे राेजी पुढे ढकलण्यात आली आहे. परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याने विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी पुन्हा काही दिवसांचा कालावधी मिळणार आहे. १० एप्रिलपर्यंत परीक्षेसाठी अर्ज करता येणार आहे.

बाॅक्स

काेराेनाचे कारण देत पुढे ढकलली परीक्षा

सध्या राज्यात काेराेनाचे रूग्ण वाढत चालले आहेत. काेराेनाची लाट आता काही दिवस पुन्हा कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. २३ मे राेजी परीक्षा हाेणार आहे. ताेपर्यंत काेराेनाची काय स्थिती राहते. त्यावरून पुन्हा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

पाचवी व आठव्या वर्गात शिकत असलेले विद्यार्थी परीक्षा देतात. वयाने हे विद्यार्थी लहान आहेत. परीक्षा केंद्रांवर गर्दी हाेणार नाही. याची खबरदारी घेण्यासाठी परीक्षा केंद्रांची संख्या वाढविण्याची गरज आहे.

परीक्षा पास हाेण्यासाठी प्रत्येक विषयात ५० टक्के गुण असणे आवश्यक आहे.मात्र केवळ परीक्षा पास झाला तर शिष्यवृत्ती मिळत नाही. त्यासाठी प्राविण्यप्राप्त गुण मिळवावे लागतात. प्राविण्यप्राप्त विद्यार्थ्याला दरमहा जवळपास १०० रुपये शिष्यवृत्ती दिली जाते.

शिष्यवृत्ती परीक्षा-२३ मे

ऑनलाईन अर्ज भरता येणार -१० एप्रिलपर्यंत

Web Title: Scholarship examination now on 23rd May