एससीएफ निवडणूक लढणार
By Admin | Updated: January 15, 2017 01:41 IST2017-01-15T01:41:48+5:302017-01-15T01:41:48+5:30
अनुसूचित जातीकरिता राखीव असलेल्या जिल्ह्यातील पाच जिल्हा परिषद क्षेत्र व गडचिरोली

एससीएफ निवडणूक लढणार
विनय बांबोळे यांची माहिती : जि.प.च्या पाच व पं.स. गणाची एक जागा
गडचिरोली : अनुसूचित जातीकरिता राखीव असलेल्या जिल्ह्यातील पाच जिल्हा परिषद क्षेत्र व गडचिरोली तालुक्यातील शिवणी पं.स. गणाची जागा आॅल इंडिया शेड्युल कास्ट फेडरेशन स्वबळावर लढणार, अशी माहिती फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष विनय बांबोळे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.
अनुसूचित जातीकरिता राखीव असलेल्या विहिरगाव-जेप्रा, इंजेवारी-ठाणेगाव, मौशीखांब-मुरमाडी व सिरोंचा तालुक्यातील नारायपूर या जि.प.क्षेत्राच्या पाच जागा व गडचिरोली तालुक्यातील शिवणी गणाची जागा शेड्युल कास्ट फेडरेशन लढणार आहे, असे बांबोळे यांनी सांगितले. विविध बलाढ्य राजकीय पक्ष अनुसूचित जातीकरिता राखीव असलेल्या जागांचा गैरफायदा घेत आहेत. अनुसूचित जातीतील खरे प्रतिनिधी निवडून येण्यासाठी फेडरेशनने निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला असून जनतेकडूनच निवडणूक फंड जमा करण्यात येईल, असे बांबोळे म्हणाले. यावेळी प्रितम साखरे, दिलीप गोवर्धन, कबीर निकुरे, राजेंद्र बांबोळे, विलास साखरे, विनोद जांभुळकर, डॉ. योगेश नंदेश्वर, सुनिता राऊत, नरेश टेंभुर्णे, अजय उंदीरवाडे हजर होते. (स्थानिक प्रतिनिधी)