आंदोलनाने एटापल्लीत जीवनोपयोगी वस्तूंची टंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2019 12:04 AM2019-08-19T00:04:21+5:302019-08-19T00:05:34+5:30

एटापल्ली तालुक्यातील समस्या मार्गी लावाव्या या मागणीसाठी एटापल्ली तालुक्यातील नागरिकांनी स्वंयस्फूर्तीने बंद पाळला आहे. सतत तिसºया दिवशी शहरातील दुकाने, हॉटेल, गुजरी बंद असल्याने जीवनाश्यक वस्तूंची टंचाई निर्माण होण्यास सुरूवात झाली आहे.

Scarcity of livelihood in Attapalli due to agitation | आंदोलनाने एटापल्लीत जीवनोपयोगी वस्तूंची टंचाई

आंदोलनाने एटापल्लीत जीवनोपयोगी वस्तूंची टंचाई

Next
ठळक मुद्देसोमवारी चक्काजाम : तिसऱ्या दिवशीही आंदोलन सुरूच

लोकमत न्यूज नेटवर्क
एटापल्ली : एटापल्ली तालुक्यातील समस्या मार्गी लावाव्या या मागणीसाठी एटापल्ली तालुक्यातील नागरिकांनी स्वंयस्फूर्तीने बंद पाळला आहे. सतत तिसºया दिवशी शहरातील दुकाने, हॉटेल, गुजरी बंद असल्याने जीवनाश्यक वस्तूंची टंचाई निर्माण होण्यास सुरूवात झाली आहे.
एटापल्ली तालुक्याचे विभाजन करून जारावंडी तालुका निर्माण करावा, बीएसएनएलसह शासकीय सेवांमध्ये सुधारणा करावी, एटापल्ली येथे जिल्हा परिषद शाळेत विज्ञान महाविद्याय सुरू करावे, आदी मागण्यांसाठी एटापल्लीत शुक्रवारपासून बंद पाळण्यात आला. स्वयंस्फूर्तीने नागरिक, दुकानदार, भाजीपाला विक्रेते, शाळकरी मुले यांनी बंदला पाठींबा देत सर्व प्रतिष्ठाने बंद ठेवली. तिसरा दिवस उलटूनही प्रशासनाने आंदोलनाची दखल घेतली नाही. कोणताही मोठा अधिकारी आंदोलनस्थळी आला नाही. त्यामुळे तिसºयाही दिवशी आंदोलन सुरूच होते. सतत तीन दिवस हॉटेल दुकाने बंद असल्याने किराणा वस्तू , भाजीपाला व इतर वस्तूंची टंचाई निर्माण होण्यास सुरूवात झाली आहे. एटापल्लीत काही कर्मचारी राहतात. सदर कर्मचारी मेसमध्ये जेवन करतात. मात्र तीन दिवसांपासून मेस सुध्दा बंद असल्याने त्यांची चांगलीच गैरसोय झाली आहे.
आंदोलनकाडे शसनाचे लक्ष वेधण्यासाठी सोमवारी सकाळपासून चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे. रविवारी जि.प. उपाध्यक्ष अजय कंकडालवार, माजी आमदार दीपक आत्राम यांनी आंदोलनाला भेट देऊन आंदोलकांशी चर्चा केली.
 

Web Title: Scarcity of livelihood in Attapalli due to agitation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.