शहरं
Join us  
Trending Stories
1
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
2
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
3
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
4
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
5
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
6
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
7
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
8
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
10
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
11
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
12
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
13
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
14
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
15
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
16
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
17
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
18
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
19
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
20
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'

चामोर्शीच्या रूग्णालयात औषधांचा तुटवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2017 00:07 IST

चामोर्शी तालुका हा लोकसंख्या व भौगोलिकादृष्ट्या विस्ताराने मोठा आहे. त्यामुळे या तालुक्यात विविध आजारांच्या रूग्णांची संख्या मोठी असते.

ठळक मुद्देरूग्णांची हेळसांड : नगर पंचायत पदाधिकाºयांच्या भेटीत झाले उघड; शासनासह यंत्रणेचा कानाडोळा

लोकमत न्यूज नेटवर्कचामोर्शी : चामोर्शी तालुका हा लोकसंख्या व भौगोलिकादृष्ट्या विस्ताराने मोठा आहे. त्यामुळे या तालुक्यात विविध आजारांच्या रूग्णांची संख्या मोठी असते. मात्र स्थानिक ग्रामीण रूग्णालयात गेल्या काही दिवसांपासून औषधांचा तुटवडा निर्माण झाल्याने रूग्णांची प्रचंड हेळसांड होत आहे.नागरिकांच्या तक्रारीवरून नगर पंचायतीच्या पदाधिकाºयांनी सोमवारी ग्रामीण रूग्णालयाला भेट देऊन येथील समस्या जाणून घेतल्या. यावेळी सदर रूग्णालयात औषधांचा तुटवडा असल्याचे उघड झाले. चामोर्शीच्या नगराध्यक्ष जयश्री वायलालवार, उपाध्यक्ष राहूल नैताम, आरोग्य व स्वच्छता सभापती विजय शातलवार यांनी ग्रामीण रूग्णालयात भेट दिली. यावेळी औषध व गोळ्यांचा तुटवडा असल्याचे दिसून आले. तसेच शूगर तपासणीसाठी लागणारे ग्लुकोज ट्रीप गेल्या अनेक दिवसांपासून येथे उपलब्ध नाही. त्यामुळे शूगरच्या रूग्णांना तपासणी न करता आल्यापावली परत जावे लागत आहे.चामोर्शीच्या ग्रामीण रूग्णालयात दररोज जवळपास ३०० रूग्णांची बाह्य रूग्ण विभागात नोंदणी होत असेते. त्यांच्यावर औषधोपचार केला जातो. मात्र येथे औषध व ग्लुकोज ट्रीपचा तुटवडा असल्याने रूग्णांना खासगी रूग्णालयाकडे धाव घ्यावी लागत आहे. परिणामी सर्वसामान्य रूग्णांवर आर्थिक भूर्दंड बसत आहे. आरोग्य विभागातर्फे चामोर्शीच्या ग्रामीण रूग्णालयात तत्काळ औषधांसह ग्लुकोज ट्रीपचा पुरवठा करावा, अशी मागणी नगराध्यक्ष वायलालवार, उपाध्यक्ष नैताम व सभापती शातलवार आदींनी केली आहे. यावेळी त्यांनी वैैद्यकीय अधीक्षक डॉ. शेखर दोरखंडे यांच्याशी चर्चा केली.रिक्त पदांमुळे आरोग्य सेवेवर परिणामचामोर्शीच्या ग्रामीण रूग्णालयात औषधोपचारासाठी येणाºया रूग्णांची संख्या मोठी आहे. मात्र या रूग्णालयात गेल्या अनेक महिन्यांपासून वैैद्यकीय अधिकाºयांसह आरोग्य कर्मचाºयांची पदे मोठ्या प्रमाणावर रिक्त आहेत. त्यामुळे या रूग्णालयाच्या आरोग्य सेवेवर परिणाम झाला आहे. विशेष म्हणजे, गंभीर रूग्णांवर येथे योग्य उपचार होत नसल्याने असे रूग्ण गडचिरोलीच्या जिल्हा सामान्य रूग्णालयात रेफर करण्याचे प्रमाणही प्रचंड वाढले आहे. तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रातही पदे रिक्त असल्याने ग्रामीण भागातील आरोग्य सेवा अस्थिपंजर झाली आहे. मात्र याकडे आरोग्य विभागासह शासनाचे कमालीचे दुर्लक्ष आहे.