शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

संकलित चाचणीच्या प्रश्नपत्रिकांचा तुटवडा

By admin | Updated: April 7, 2017 01:18 IST

शिक्षण विभागाच्या वतीने पहिली ते आठवीची संकलित चाचणी ६ व ७ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आली आहे.

उशिरा पेपर सुरू : शाळांवर हजारो रूपयांचा भूर्दंडगडचिरोली : शिक्षण विभागाच्या वतीने पहिली ते आठवीची संकलित चाचणी ६ व ७ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आली आहे. दरम्यान देसाईगंज व गडचिरोली तालुक्यातील काही शाळांमध्ये प्रश्नपत्रिकांचा तुटवडा निर्माण झाला होता. त्यामुळे शाळांना झेरॉक्स काढून प्रश्नपत्रिका उपलब्ध करून द्याव्या लागल्या. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र या उपक्रमाअंतर्गत राज्यभरातील विद्यार्थ्यांची बोर्डाच्या परीक्षेप्रमाणे सामूहिक परीक्षा घेतली जाते. या परीक्षेचे पेपर विद्या परिषदेच्या मार्फतीने शाळांना उपलब्ध करून दिले जातात. मागील वर्षीपासून सदर परीक्षा घेतली जात आहे. शैक्षणिक सत्राच्या सुरुवातीच्या कालावधीत संकलित चाचणी क्रमांक १ घेण्यात आली होती. त्यानंतर ६ व ७ एप्रिल रोजी संकलित चाचणी क्रमांक २ घेण्याचे नियोजन शिक्षण विभागाने केले होते. या चाचणीसाठी आवश्यक असणाऱ्या प्रश्नपत्रिका विद्या परिषद उपलब्ध करून देते. मात्र गडचिरोली तालुक्यातील काही शाळांना प्रश्नपत्रिकांचा तुटवडा निर्माण झाला होता. प्रश्नपत्रिकांचे वितरण गटशिक्षणाधिकारी कार्यालयाच्या मार्फतीने करण्यात आले. मात्र या ठिकाणी नियोजनाचा अभाव होता. शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार प्रश्नपत्रिकांची मागणी केली होती. प्रत्यक्षात मात्र कमी संख्येत प्रश्नपत्रिका उपलब्ध झाल्या. यामध्ये प्रामुख्याने सेमी इंग्लिश माध्यमांच्या शाळांना समस्या जाणवली. गडचिरोली येथील जवाहरलाल नेहरू उच्च प्राथमिक शाळेत सेमी इंग्लिश मीडियम आहे. या विद्यार्थ्यांची प्रथम भाषा इंग्रजी आहे. त्यामुळे भाषा विषयाच्या संकलित चाचणीचे पेपर इंग्रजीमधून उपलब्ध होणे आवश्यक होते. या शाळेत प्रत्येक वर्गात जवळपास ४० ते ५० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तेवढ्या प्रश्नपत्रिका असणे गरजेचे होते. मात्र केवळ ४ ते ५ प्रश्नपत्रिका उपलब्ध झाल्या. परिणामी प्रश्नपत्रिकांच्या झेरॉक्स काढून विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका द्याव्या लागल्या. काही ठिकाणी पहिल्या गट्ट्यात तिसरीच्या प्रश्नपत्रिका आढळून आल्या. शाळेवर सदर प्रश्नपत्रिका नेल्यानंतर ऐन वेळेवर शिक्षकांची फार मोठी धावपळ झाली. शिक्षण विभागाच्या या कारभाराबाबत मुख्याध्यापक व शिक्षकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. शुक्रवारी गणिताचा पेपर आयोजित करण्यात आला आहे. याही पेपरच्या अत्यंत कमी प्रश्नपत्रिका उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळे याही प्रश्नपत्रिकांची झेरॉक्स काढावी लागली. यामध्ये बराच वेळ गेला. (नगर प्रतिनिधी)