रणजीतकुमार व मेहता यांना निरोप

By Admin | Updated: May 21, 2016 01:24 IST2016-05-21T01:24:15+5:302016-05-21T01:24:15+5:30

गडचिरोलीचे तत्कालीन व सध्याचे सोलापूर येथील जिल्हाधिकारी रणजीतकुमार व गडचिरोली जि.प.च्या मुख्य ...

Saying Ranjeet Kumar and Mehta | रणजीतकुमार व मेहता यांना निरोप

रणजीतकुमार व मेहता यांना निरोप

गडचिरोलीत कार्यक्रम : कासवी ग्राम पंचायतीचा पुढाकार
गडचिरोली : गडचिरोलीचे तत्कालीन व सध्याचे सोलापूर येथील जिल्हाधिकारी रणजीतकुमार व गडचिरोली जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी संपदा मेहता यांना नुकताच जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात कासवी ग्राम पंचायतीच्या वतीने निरोप देण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नवनियुक्त जिल्हाधिकारी अमगोथू श्रीरंग नायक होते.
यावेळी सोलापूरचे जिल्हाधिकारी रणजीतकुमार, गडचिरोलीच्या तत्कालीन सीईओ संपदा मेहता, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील, अप्पर जिल्हाधिकारी महेश आव्हाड, उपवनसंरक्षक श्रीलक्ष्मी अनबत्तुला, निवासी उपजिल्हाधिकारी दुर्वेश सोनवने, देसाईगंजचे उपविभागीय अधिकारी दामोधर नान्हे उपस्थित होते.
कार्यक्रमात जिल्हाधिकारी रणजीतकुमार व सीईओ संपदा मेहता यांच्या कार्यकाळात झालेल्या विकास कामांचा उपस्थितांनी गौरवपूर्ण उल्लेख केला. कार्यक्रमाला उपसरपंच प्रवीण रहाटे, चंद्रकांत दोनाडकर, प्रभाकर गडपायले, ईश्वर गुरनुले, रितेश शेडमाके, सडमाके, दीपक दुपारे, दिनेश आठोडे, गुलाब भोयर उपस्थित होते. संचालन राजू वडपल्लीवार तर आभार चंदू प्रधान यांनी मानले.

Web Title: Saying Ranjeet Kumar and Mehta