सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना जि.प.कडे
By Admin | Updated: August 4, 2016 01:37 IST2016-08-04T01:37:14+5:302016-08-04T01:37:14+5:30
विमुक्त जाती भटक्या जमाती संचालनालयांतर्गत राबविण्यात येणारी विजाभज व विशेष मागास प्रवर्गातील

सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना जि.प.कडे
शासनाकडून नवा निर्णय : विजाभज प्रवर्गातील ८ ते १० च्या विद्यार्थिनींना मिळणार लाभ
गडचिरोली : विमुक्त जाती भटक्या जमाती संचालनालयांतर्गत राबविण्यात येणारी विजाभज व विशेष मागास प्रवर्गातील इयत्ता आठ ते दहावीतील विद्यार्थिनींसाठी सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना यापूर्वी सहायक आयुक्त समाज कल्याण यांच्या कार्यालयामार्फत राबविण्यात येत होती. मात्र सदर योजनेची अंमलबजावणी यंत्रणा शासनाने बदलविली असून तसा निर्णय घेतला आहे. त्यामुळे विजाभज प्रवर्गातील विद्यार्थिनींसाठी राबविण्यात येणारी सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना आता जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणार आहे.
सन २०१६-१७ या शैक्षणिक सत्रात जिल्हा परिषद, नगर परिषद व शासन मान्यताप्राप्त शाळेतील इयत्ता ८ ते १० वीमध्ये शिकत असलेल्या विमुक्त जाती, भटक्या जमाती प्रवर्गातील मुलींना या शिष्यवृत्तीचा लाभ देण्यात येणार आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
विजाभज व विमाप्र या प्रवर्गातील मुलींचे सावित्रीबाई फुले शिष्यवृत्तीचे प्रस्ताव मुख्याध्यापकांनी आॅनलाईन भरून आवश्यक कागदपत्रांसह समाज कल्याण विभाग जि.प. गडचिरोली कार्यालयात ३० नोव्हेंबरपर्यंत सादर करावे.
- सुरेश पेंदाम, जिल्हा समाज कल्याण अधिकारी जि.प.