नदीत बुडणाऱ्या वृद्धाला वाचविले
By Admin | Updated: June 19, 2017 01:39 IST2017-06-19T01:39:13+5:302017-06-19T01:39:13+5:30
अहेरी तालुका मुख्यालयापासून तीन किमी अंतरावर असलेल्या वांगेपल्लीजवळील प्राणहिता नदी पात्रात मागील दोन दिवसात

नदीत बुडणाऱ्या वृद्धाला वाचविले
युवकांचा पुढाकार : दोन दिवसांत दुसरी घटना
लोकमत न्यूज नेटवर्क
अहेरी : अहेरी तालुका मुख्यालयापासून तीन किमी अंतरावर असलेल्या वांगेपल्लीजवळील प्राणहिता नदी पात्रात मागील दोन दिवसात दोघांना बुडण्यापासून वाचविण्यात आले. शनिवारी झालेल्या दुसऱ्या घटनेत युवकांनी एका वृध्द इसमाला नदी पात्रात बुडण्यापासून वाचविले. प्राणहिता नदीत बुडण्यापासून वाचविल्याची ही दोन दिवसातील दुसरी घटना आहे.
शनिवारी तेलंगणा राज्यातील काही लोक अहेरी येथील आठवडी बाजारासाठी अहेरीत आले होते. साहित्याची खरेदी करून ते सायंकाळी ६.१५ वाजता तेलंगणाकडे परत जात होते. दरम्यान दोन जणांनी प्राणहिता नदीतील वाहत्या पाण्यातून मार्गक्रमण करण्याचा प्रयत्न केला. याचवेळी एक वृध्द इसमाचा तोल गेल्याने तो पाण्यात बुडू लागला. त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या युवकांनी वृध्दाला पाण्याबाहेर काढून वाचविले. वाढत्या जलस्तरामुळे अशा घटना घडत आहे.