नायलाॅन मांजामध्ये अडकलेल्या चट्टेरी वन घुबडाला जीवनदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 05:08 IST2021-02-21T05:08:56+5:302021-02-21T05:08:56+5:30
गडचिरोली : येथे नायलाॅन मांजामध्ये अडकलेल्या चट्टेरी वन घुबडाला जीवनदान देण्यात आले. गडचिरोली येथील पोटेगाव मार्गावरील मुख्य वनसंरक्षक यांच्या ...

नायलाॅन मांजामध्ये अडकलेल्या चट्टेरी वन घुबडाला जीवनदान
गडचिरोली : येथे नायलाॅन मांजामध्ये अडकलेल्या चट्टेरी वन घुबडाला जीवनदान देण्यात आले. गडचिरोली येथील पोटेगाव मार्गावरील मुख्य वनसंरक्षक यांच्या निवासस्थानी असलेल्या झाडावर चट्टेरी वनघुबड नायलाॅन मांजामध्ये अडकलेल्या अवस्थेत काही नागरिकांना दिसून आला. याबाबत वनविभाला माहिती देण्यात आली. वनविभागाने पेसा संस्थेच्या सदस्यांना याबाबत सांगितले. त्यानंतर लगेच पेसा संस्थेचे अजय कुकडकर, मनोज पिपरे, चेतन शेडे यांनी घटनास्थळी धाव घेत झाडावरील चट्टेरी घुबडाला पकडून नायलाॅन मांजामधून सुटका केली. घुबडाला दुखापत नसल्याने त्याला जंगल परिसरात सोडून जीवनदान देण्यात आले. यावेळी मुकेश लांजेवार, अनिल हुलके, उत्तम हुलके, प्रफुल्ल राऊत, प्रकाश कोहचाडे, शेखर म्हशाखेत्री यांनी सहकार्य केले. नायलाॅन मांजावर बंदी असताना सुद्धा नायलाॅन मांजाची छुप्या मार्गाने विक्री जोमात सुरू आहे. अवैधरीत्या नायलाॅन मांजाविक्रेत्यांवर कारवाई करावी, अशी मागणी पेसा संस्थेच्या सदस्यांनी केली आहे.