स्वत:च्या स्वार्थासाठी नक्षल्यांनी केली दिशाभूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2017 00:53 IST2017-07-29T00:52:41+5:302017-07-29T00:53:00+5:30
स्वत:चा स्वार्थ साधण्यासाठी दुर्गम भागात असलेल्या आदिवासींचा वापर केला आहे. त्यांना विकासापासून वंचित ठेवले.

स्वत:च्या स्वार्थासाठी नक्षल्यांनी केली दिशाभूल
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : स्वत:चा स्वार्थ साधण्यासाठी दुर्गम भागात असलेल्या आदिवासींचा वापर केला आहे. त्यांना विकासापासून वंचित ठेवले. हिंसेच्या माध्यमातून त्यांनी वचक निर्माण केला, असे प्रतिपादन अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. हरी बालाजी यांनी केले.
उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय गडचिरोलीतर्फे २५ ते २७ जुलै दरम्यान जनमैत्री मेळावा व तीन दिवशीय निवासी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याचे समारोपीय कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून डॉ. हरी बालाजी बोलत होते. यावेळी पोलीस उपअधीक्षक (अभियान) नवनाथ ढवळे, पोलीस उपअधीक्षक गृह गणेश बिरादार, नगर परिषदेचे मुख्याधिकारी निपाने, जिल्हा क्रीडा अधिकारी शिंदे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.सागर कवडे आदी मान्यवर उपस्थित होते. मेळाव्याला चामोर्शी, पोटेगाव, घोट, रेगडी येथील दुर्गम भागातील आदिवासी बांधव उपस्थित होते. वैद्यकीय अधिकारी डॉ. रामटेके यांच्याकडून शिबिरार्थींची तपासणी करण्यात आली. त्यांना शेती उपयोगी साहित्याचे वितरण करण्यात आले. व्यसनाधिनतेचे आरोग्यावर होणाºया परिणामाविषयी मार्गदर्शन केले. शासनाच्या मार्फत राबविण्यात येणाºया विविध योजनांची माहिती दिली. योजनांच्या अर्जांचे वाटप करण्यात आले. दहशतवाद व नक्षलवाद विरोधी शपथ देण्यात आली. संचालन व आभार पीएसआय सतीश सिरसाट यांनी मानले.