ग्रामगीता जीवनाची संस्कार शाळा
By Admin | Updated: March 29, 2015 01:29 IST2015-03-29T01:29:01+5:302015-03-29T01:29:01+5:30
महाभारतातील अर्जुनाला माणुसकीचे पाठ शिकविण्यासाठी व कर्तव्यपरायण करण्यासाठी विराट रूपाचे दर्शन दाखवावे लागले.

ग्रामगीता जीवनाची संस्कार शाळा
देसाईगंज : महाभारतातील अर्जुनाला माणुसकीचे पाठ शिकविण्यासाठी व कर्तव्यपरायण करण्यासाठी विराट रूपाचे दर्शन दाखवावे लागले. ग्रामगीता ही देखील मानवी जीवनाची संस्कार शाळा आहे. ग्रामगीतेच्या माध्यमातून स्वत:बरोबरच देशाचा विकास करण्याचे धडे मिळतात, असे प्रतिपादन प्रवचनकार जयरामदास गहाणे यांनी केले.
हनुमान वार्डातील श्री साई मंदिरात श्रीमद् भागवत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. या सप्ताहाच्या पाचव्या दिवशी प्रवचन करताना ते बोलत होते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी लिहिलेल्या ग्रामगीतेत ग्रामीण जीवनाचे दर्शन घडते. राष्ट्रसंताना देव हा मानसातच दिसला होता. समाजात वाढत चालल्या अनैतीकतेबाबत भाष्य करताना राष्ट्रसंतानी ग्रामगीतेत भिक मागताना परमेश्वर दिसला, मात्र माणूस दिसला नाही, असे सांगितले आहे.
युवक व नागरिकांमध्ये व्यसनाधिनतेचे प्रमाण वाढत चालले आहे. समाजातील नैतिकता ढासळत चालली आहे. योग्य संस्कारांचा अभाव असल्याने हे सर्व घडत आहे. ग्रामगीता ही चांगल्या संस्काराची औषधी व संजिवनी बुटी आहे, असे प्रतिपादन केले.
श्रीमद् भागवत सप्ताहादरम्यान दर दिवशी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत होते. सकाळच्या पूजेपासून कार्यक्रमाला सुरूवात होत होती. प्रत्येक रात्री जवळपास १० वाजेपर्यंत विविध प्रवचनकारांचे प्रवचन राहत होते. त्यामुळे धार्मिक वातावरण निर्माण होण्यास मदत झाली. यशस्वीतेसाठी श्री संप्रदाय सेवा समिती, महालक्ष्मी महिला मंडळ व साईबाबा मंदिर सेवा समितीच्या कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.