ंसंजय भांडारकर समाज गौरव पुरस्काराने सन्मानित
By Admin | Updated: March 2, 2017 02:01 IST2017-03-02T02:01:50+5:302017-03-02T02:01:50+5:30
जैन कलार समाज सेवा समिती नागपूरच्या वतीने रविवारी नागपूर येथे प्रयास २०१७ अंतर्गत समाज

ंसंजय भांडारकर समाज गौरव पुरस्काराने सन्मानित
शिक्षण क्षेत्रातील कामगिरी : जैन कलार समाजातर्फे गौरव
गडचिरोली : जैन कलार समाज सेवा समिती नागपूरच्या वतीने रविवारी नागपूर येथे प्रयास २०१७ अंतर्गत समाज संमेलन व आनंद मेळावा पार पडला. याप्रसंगी शिक्षण क्षेत्रातील भरीव कामगिरीबाबत गडचिरोली येथील प्राचार्य डॉ. संजय भांडारकर यांना समाज गौरव पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आला.
याप्रसंगी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, जैन कलार समाज सेवा समिती मध्यवर्ती मंडळाचे संस्थापक अध्यक्ष अनिल अहिरकर, केंद्रीय अध्यक्ष शेखर आदमने आदी मान्यवर उपस्थित होते. मराठी विज्ञान परिषद गडचिरोली व प्रियंका हायस्कूल कनेरीच्या वतीने मराठी राजभाषा दिन तथा राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून प्राचार्य संजय भांडारकर यांचा सत्कार करण्यात आला होता. त्यानंतर शिक्षण क्षेत्रातील कामगिरीची दखल घेऊन जैन कलार समाज सेवा समितीतर्फे प्राचार्य भांडारकर यांचा सपत्नीक सन्मान करण्यात आला. यावेळी आमदार, खासदारांचीही उपस्थिती होती.
समाज गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल प्राचार्य भांडारकर यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.