रेती चोरी करणारा ट्रॅक्टर जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 05:07 IST2021-03-13T05:07:07+5:302021-03-13T05:07:07+5:30

जप्त केलेल्या ट्रॅक्टर विकास पोटे रा. विहीरगाव यांच्या मालकीचा आहे. खोब्रागडी नदीची रेती चोरून ती विकण्याचा गोरख धंदा मागील ...

Sand-stealing tractor seized | रेती चोरी करणारा ट्रॅक्टर जप्त

रेती चोरी करणारा ट्रॅक्टर जप्त

जप्त केलेल्या ट्रॅक्टर विकास पोटे रा. विहीरगाव यांच्या मालकीचा आहे.

खोब्रागडी नदीची रेती चोरून ती विकण्याचा गोरख धंदा मागील अनेक दिवसापासून काही ट्रॅक्टर मालक करीत आहेत ही बाब वन विभागाच्या लक्षात आल्यानंतर दि.१० मार्च रोजी पहाटे आरमोरीचे वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन डोंगरवार, वनरक्षक विकास शिवणकर, विनोद कवडो यांनी सापळा रचून ट्रॅक्टर जप्त केला. या ट्रॅक्टरवर अंदाजे १लाख १२ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.

प्राप्त माहितीनुसार आरमोरीचे वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन डोंगरवार यांनी बुधवारच्या पहाटे खोब्रागडी नदीत तीन ट्रॅक्टर पकडले होते. दोन ट्रॅक्टर मध्ये रेती भरली नव्हती म्हणून ते ट्रॅक्टर सोडून दिले. असे वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन डोंगरवार यांनी सांगीतले.

Web Title: Sand-stealing tractor seized