सालमारा - कनेरी मार्गाची दुरवस्था ; दुरुस्तीची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:34 IST2021-03-24T04:34:23+5:302021-03-24T04:34:23+5:30
सालमारा - कनेरी या मार्गाचे बांधकाम काही वर्षांपूर्वी झाले. चार वर्षांपासून या मार्गाच्या दुरवस्थेत भर पडली. या मार्गावरून दुचाकी, ...

सालमारा - कनेरी मार्गाची दुरवस्था ; दुरुस्तीची मागणी
सालमारा - कनेरी या मार्गाचे बांधकाम काही वर्षांपूर्वी झाले. चार वर्षांपासून या मार्गाच्या दुरवस्थेत भर पडली. या मार्गावरून दुचाकी, चारचाकी वाहनासह अवजड वाहतूक होत असते. या रस्त्याच्या एका ठिकाणी मोठे भगदाड पडले आहे. रात्रीच्या सुमारास वाहनधारकांच्या दृष्टीस सदर भगदाड येत नाही. त्यामुळे येथे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. वर्षभर मार्गावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत.
मागील वर्षीच्या खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे रस्त्याच्या दुरवस्थेत भर पडली. त्यामुळे सदर रस्त्याच्या दुरूस्तीची मागणी अनेकदा नागरिकांनी केली. परंतु या मागणीकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्षच झाले. या मार्गाची दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. लाेकप्रतिनिधींचे आश्वासन फाेल ठरले आहे. ------------------------------------------------------------------------------------------------------------------
डबल बातमी आहे.........
n लोकमत न्यूज नेटवर्क
आरमोरी : तालुक्यातील सालमारा ते कनेरी या ४ किमी मार्गाची प्रचंड दुरवस्था झाली आहे. त्यामुळे या मार्गाने प्रवास करताना नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
सालमारा - कनेरी या मार्गाचे बांधकाम काही वर्षांपूर्वी झाले. चार वर्षांपासून या मार्गाच्या दुरवस्थेत भर पडली. या मार्गावरून दुचाकी, चारचाकी वाहनासह अवजड वाहतूक होत असते. या रस्त्याच्या एका ठिकाणी मोठे भगदाड पडले आहे. रात्रीच्या सुमारास वाहनधारकांच्या दृष्टीस सदर भगदाड येत नाही. त्यामुळे येथे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. वर्षभर मार्गावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत.
मागील वर्षीच्या खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे रस्त्याच्या दुरवस्थेत भर पडली. त्यामुळे सदर रस्त्याच्या दुरूस्तीची मागणी अनेकदा नागरिकांनी केली. परंतु या मागणीकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्षच झाले. या मार्गाची दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. लाेकप्रतिनिधींचे आश्वासन फाेल ठरले आहे.