साळ्यांनी केली बहीण जावयाची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:24 IST2021-06-19T04:24:46+5:302021-06-19T04:24:46+5:30

टिकाराम महादेव चुधरी (४०), रा. नराेटी चक, ता. आरमाेरी असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. टिकाराम मागील काही वर्षांपासून ...

Sally killed her sister-in-law | साळ्यांनी केली बहीण जावयाची हत्या

साळ्यांनी केली बहीण जावयाची हत्या

टिकाराम महादेव चुधरी (४०), रा. नराेटी चक, ता. आरमाेरी असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. टिकाराम मागील काही वर्षांपासून गाेगाव येथे राहत हाेता. त्याला दारूचे व्यसन असल्याने पत्नी रंजना व त्याच्यामध्ये नेहमीच भांडण हाेत हाेते. १४ जून राेजी त्याने साेडचिठ्ठीसाठी रंजनाकडे तगादा लावला. १५ जून राेजी रंजनाने याबाबतची माहिती तिचे भाऊ रमेश नामदेव लाकडे व काशीनाथ नामदेव लाकडे यांना दिली. ते दाेघेही वनखीवरून गाेगाव येथे १५ जून राेजीच सकाळी दाखल झाले. सर्वप्रथम टिकारामला राहत असलेल्या घरी बेदम मारहाण केली. तो बेशुद्ध पडला असताना त्याला रस्त्यावर आणले व त्याच्या गुप्तांगावरून दुचाकी चालविली. यात टिकाराम जागीच मृत्युमुखी पडला. याबाबत पाेलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर पाेलिसांनी रमेश नामदेव लाकडे व काशीनाथ नामदेव लाकडे या दाेघांना अटक केली. न्यायालयाने त्यांची पाेलीस काेठडीत रवानगी केली आहे.

Web Title: Sally killed her sister-in-law