डायट अधिकारी व कर्मचाऱ्यांचे वेतन थकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:37 IST2021-05-09T04:37:48+5:302021-05-09T04:37:48+5:30
गडचिराेली जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेत प्राचार्य, ज्येष्ठ अधिव्याख्याता, अधिव्याख्याता, लिपिक, स्टेनाे, तंत्रज्ञ, लेखापाल, शिपाई आदी जवळपास १७ कर्मचारी ...

डायट अधिकारी व कर्मचाऱ्यांचे वेतन थकले
गडचिराेली जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेत प्राचार्य, ज्येष्ठ अधिव्याख्याता, अधिव्याख्याता, लिपिक, स्टेनाे, तंत्रज्ञ, लेखापाल, शिपाई आदी जवळपास १७ कर्मचारी कार्यरत आहेत. डायटच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या वेतनापैकी ६० हिस्सा केंद्र शासन तर ४० हिस्सा राज्यशासनाचा राहते. केंद्र शासनाकडून वेतनाचा हिस्सा प्राप्त झाला नाही, म्हणून राज्य शासनाने ही आपला हिस्सा दिला नाही. काही कर्मचाऱ्यांचे डिसेंबर २०२० तर काही कर्मचाऱ्यांचे फेब्रुवारी २०२१ पासून वेतन झाले नाही.
सध्या काेराेनाचे संकट सुरू आहे. काही कर्मचारी व अधिकारी काेराेना पाॅझिटिव्ह आले आहेत. उपचारावर लाखाे रूपये खर्च झाले आहेत. अशा स्थितीत वेतन झाले नसल्याने हे कर्मचारी आर्थिक अडचणीत आले आहेत. वेतन नियमित द्यावे अशी मागणी डायटच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांकडून हाेत आहे.