केंद्रप्रमुखांचे चार महिन्यांपासूनचे वेतन थकले
By Admin | Updated: March 18, 2015 01:37 IST2015-03-18T01:37:53+5:302015-03-18T01:37:53+5:30
धानोरा तालुक्यात जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या केंद्रप्रुखांचे नोव्हेंबर २०१४ पासूनचे वेतन अद्याप झालेले नाहीत.

केंद्रप्रमुखांचे चार महिन्यांपासूनचे वेतन थकले
धानोरा : धानोरा तालुक्यात जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या केंद्रप्रुखांचे नोव्हेंबर २०१४ पासूनचे वेतन अद्याप झालेले नाहीत. त्यामुळे मागील चार महिन्यांपासून केंद्रप्रमुख विनावेतन काम करीत आहे. मार्च महिना संपत आला असला तरी केंद्रप्रमुखांच्या वेतनासाठी अद्याप निधीची तरतूद करण्यात आली नसल्याने केंद्रप्रमुखांची आर्थिक अडचण वाढली आहे.
धानोरा तालुक्यात १२ केंद्रप्रमुखांचे पद मंजूर आहेत. त्यापैकी ९ केंद्रप्रमुख सध्या कार्यरत आहे. तीन पद रिक्त आहेत. या केंद्रप्रमुखांना नोव्हेंबर २०१४ पासून चार महिन्यांचे वेतन मिळालेले नाही. केंद्रप्रमुखांना शिक्षकांना मार्गदर्शन करणे, भेटी देऊन शाळा तपासणी करणे, शासकीय माहितीची देवाणघेवाण करणे आदी कामे करावे लागतात. एका केंद्रप्रमुखांकडे १५ ते २० शाळांचा प्रभार आहे. चार महिन्यांपासून वेतन नसल्याने केंद्रप्रमुख आर्थिक अडचणीत आहे. गडचिरोली जिल्ह्याच्या इतर तालुक्यातील केंद्रप्रमुखांचे वेतन वेळेवर व नियमित होत असताना धानोरा तालुक्यात मागील चार महिन्यांपासून निधी नसल्यामुळे वेतन रखडलेले आहे. त्यामुळे प्रचंड असंतोष केंद्रप्रमुखांमध्ये पसरलेला आहे. दुर्गम भागातसुद्धा अनेक शाळांमध्ये काम करणाऱ्या शिक्षकांच्या कामावर देखरेख ठेवण्याचे काम केंद्रप्रमुखांनाच करावे लागते. यासाठी प्रवास खर्चही सध्या जवळूनच करावा लागत आहे.