लिलावात खरेदी केलेले साेने निघाले बनावट?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:52 IST2021-02-05T08:52:49+5:302021-02-05T08:52:49+5:30

देसाईगंज : येथील कन्नमवार वार्डातील रहिवासी असलेल्या नंदलाल अर्जुनदास माेटवानी यांनी बँक ऑफ इंडियाच्या देसाईगंज येथील शाखेद्वारे आयाेजित केलेल्या ...

Sae bought at auction went fake? | लिलावात खरेदी केलेले साेने निघाले बनावट?

लिलावात खरेदी केलेले साेने निघाले बनावट?

देसाईगंज : येथील कन्नमवार वार्डातील रहिवासी असलेल्या नंदलाल अर्जुनदास माेटवानी यांनी बँक ऑफ इंडियाच्या देसाईगंज येथील शाखेद्वारे आयाेजित केलेल्या लिलावात बाेली लावून ३ लाख ४ हजार रुपयांचे साेने ३१ मार्च २०१९ राेजी खरेदी केले. हे साेने बनावट निघाल्याचा आराेप नंदलाल माेटवानी यांनी केला आहे. याबाबतची तक्रार देसाईगंज पाेलीस ठाण्यामध्ये दाखल केली आहे. नंदलाल माेटवानी यांनी बँकेकडून ११ नग बांगड्या, दाेन नग चैन व एक नग काळीपाेत खरेदी केले. बँकेतर्फे आणण्यात आलेले गाेल्ड व्हॅल्युअर एकनाथ बांगरे यांनी हे साेने शुद्ध असल्याची पावती दिली. त्यांच्यावर विश्वास ठेवून तत्कालीन शाखा व्यवस्थापक अमित हुड, साक्षीदार जेसामल माेटवानी, गजानन भुर्रे, इमरान जावेद शेख, ताेषीफ कुरेशी, जावेद शेख, अस्पाकअली सय्यद यांच्या समक्ष माेटवानी यांनी साेने खरेदी केले. खरेदी केल्यापासून साेने घरीच ठेवले हाेते. आता त्यांच्या मुलीचे लग्न असल्याने दागिने माेडण्यासाठी ते देसाईगंज येथील एका ज्वेलर्सकडे गेले असता, चुडी व चैनच्या दागिन्यांमध्ये ६२ टक्के तांबे असून, वरून साेन्याची काेटिंग केली असल्याचे आढळून आले. तसेच काळीपाेतमध्ये ३० टक्के तांबे असल्याचे सांगितले. तशी पावती त्यांनी लिहून दिली. याबाबत ११ जानेवारी राेजी बँक ऑफ इंडियाचे शाखा व्यवस्थापक यांच्याकडे लेखी तक्रार दिली असता, त्यांनी काेणतीही जबाबदारी घेतली नाही. या प्रकरणात शाखा व्यवस्थापक अमित हुड व गाेल्ड व्हॅल्युअर एकनाथ बांगरे यांनी संगनमत करून फसवणूक केल्याची तक्रार नंदलाल माेटवानी यांनी देसाईगंज पाेलीस ठाण्यामध्ये केली आहे.

याबाबत देसाईगंज पाेलिसांना विचारले असता, या प्रकरणाची चाैकशी सुरू आहे. अजूनपर्यंत गुन्हा दाखल झाला नसल्याची माहिती दिली.

Web Title: Sae bought at auction went fake?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.