लोकमत न्यूज नेटवर्कमानापूर/देलनवाडी : आरमोरी तालुक्यातील देलनवाडी परिसरातील शेतकऱ्यांकडून युरियाची मागणी वाढली आहे. मात्र त्या तुलनेत पुरवठा कमी झाल्याने शेतकरी युरियासाठी धावपळ करीत असल्याचे दिसून येत आहे.दोन दिवसांपूर्वी आरसीएफ कंपनीचा २२०० मेट्रिक टन युरिया उपलब्ध झाला. यापैकी ३५ मेट्रिक टन युरिया देलनवाडी येथील एका खासगी केंद्राला व आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेला उपलब्ध करून देण्यात आला. रोवणी झाली असल्याने शेतकरी आता धानपिकाला युरिया खताची मात्रा देतात. त्यामुळे या खताची मागणी वाढली आहे. देलनवाडी येथील खासगी कृषी केंद्राला १० मेट्रिक टन व सहकारी संस्थेला २५ मेट्रिक टन खत आल्याची माहिती मिळताच शेकडो शेतकऱ्यांनी युरिया खरेदीसाठी गर्दी केली होती. यातील बहुतांश शेतकरी संस्थेचे सभासद आहेत.सर्वच शेतकऱ्यांना पुरेसा खत देणे शक्य नसल्याने संस्थेच्या व्यवस्थापकाने प्रत्येक शेतकऱ्याला एक ते दोन बॅग खत देऊन त्यांचे समाधान केले. मात्र शेतकऱ्यांची खताची मागणी अधिक आहे. अजूनही काही शेतकऱ्यांना खत उपलब्ध झाले नाही. सहकारी संस्था शासनाने ठरवून दिलेल्या किमतीतच खताची विक्री करतात. त्यामुळे शेतकऱ्याची लूट होत नाही. परिणामी शेतकरी सहकारी संस्थेकडूनच खत खरेदी करण्यास प्राधान्य देतात. खासगी विक्रेते मात्र वेळप्रसंग पाहून शेतकऱ्यांकडून अधिकची किंमत नाकारण्यास मागे-पुढे पाहत नाही.सहकारी संस्थेकडचा युरिया संपला आहे. त्यामुळे कृषी विभागाने पाठपुरावा करून पुरेसा युरिया उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
देलनवाडीत युरियासाठी धावपळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2020 05:00 IST
दोन दिवसांपूर्वी आरसीएफ कंपनीचा २२०० मेट्रिक टन युरिया उपलब्ध झाला. यापैकी ३५ मेट्रिक टन युरिया देलनवाडी येथील एका खासगी केंद्राला व आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेला उपलब्ध करून देण्यात आला. रोवणी झाली असल्याने शेतकरी आता धानपिकाला युरिया खताची मात्रा देतात. त्यामुळे या खताची मागणी वाढली आहे.
देलनवाडीत युरियासाठी धावपळ
ठळक मुद्देअपुरा पुरवठा : प्रत्येक शेतकऱ्याला एक ते दोन बॅग देऊन केली बोळवण