ग्रामीण रूग्णालय समस्याग्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2019 05:00 IST2019-09-30T05:00:00+5:302019-09-30T05:00:56+5:30
सिरोंचा तालुक्यात आरोग्यसेवा योग्य प्रकारे दिली जात नसल्याने रूग्णांना नेहमीच त्रास सहन करावा लागतो. येथील ग्रामीण रूग्णालयातील अनेक पदे रिक्त आहेत. तसेच गरोदर महिलांना ने-आण करण्याकरिता सुसज्ज रूग्णवाहिका नसल्याने महिलांना त्रास होत आहे. विविध समस्यांनी रूग्णालय ग्रस्त आहे. सिरोंचा ग्रामीण रूग्णालयात वैैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे रूग्णांवर वेळेवर योग्य सल्ला व उपचार मिळत नाही.

ग्रामीण रूग्णालय समस्याग्रस्त
लोकमत न्यूज नेटवर्क
सिरोंचा : गडचिरोली जिल्ह्याच्या अंतिम टोकावर व तेलंगणा, छत्तीसगड राज्याला लागून असलेल्या सिरोंचा तालुक्यात आरोग्यसेवा योग्य प्रकारे दिली जात नसल्याने रूग्णांना नेहमीच त्रास सहन करावा लागतो. येथील ग्रामीण रूग्णालयातील अनेक पदे रिक्त आहेत. तसेच गरोदर महिलांना ने-आण करण्याकरिता सुसज्ज रूग्णवाहिका नसल्याने महिलांना त्रास होत आहे. विविध समस्यांनी रूग्णालय ग्रस्त आहे.
सिरोंचा ग्रामीण रूग्णालयात वैैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे रूग्णांवर वेळेवर योग्य सल्ला व उपचार मिळत नाही. कर्मचाऱ्यांअभावी रूग्णांना रेफर केले जाते. १०८ रूग्णवाहिकेसोबत वैैद्यकीय अधिकारी देणे आवश्यक आहे. परंतु १०८ रूग्णवाहिकेसोबत डॉक्टर पाठविले जात नाही. रूग्णालयातील एमएस डॉक्टरचे पद मागील दहा वर्षांपासून रिक्त आहे. त्यामुळे तालुक्यातील सर्व रूग्णांना सल्ला व समूपदेशन मिळत नाही. येथील रिक्त पद भरण्याकडे शासन व प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते.
तालुक्यातील सर्व शासकीय व निमशासकीय शाळांतील विद्यार्थी व अंगणवाडीतील बालकांची मोफत तपासणी करणे हे या अभियानाचे काम आहे. रूग्णालयात अद्यापही १०२ क्रमांकाची रूग्णवाहिका उपलब्ध झाली नाही. शासनाने प्रत्येक रूग्णालयात गरोदर मातांच्या तत्काळ उपचाराकरिता १०४ क्रमांकाची रूग्णवाहिका उपलब्ध करून दिली आहे. परंतु येथील रूग्णालयात अद्यापही १०४ क्रमांकाची रूग्णवाहिका उपलब्ण झाली नाही. जी रूग्णवाहिका उपलब्ध आहे ती नेहमीच नादुरूस्त तसेच बिघाड झाल्याचे दिसून येते. या समस्येमुळे गरोदर महिलांना रूग्णालयात वेळेवर पोहोचण्यासाठी खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागतो. रूग्णालयात प्रसूतीगृह आहे. परंतु त्याच्या परिसरात मोकाट डुकरे फिरतांना दिसतात. या परिसरात दुर्गंधी असल्याने परिसरातून रूग्णालयात घाणेरडा वास येत असतो. त्यामुळे नवजात बालकांना संसर्गजन्य रोगांची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. रूग्णवाहिका नसल्याने गरोदर महिलांना भरती करण्यासाठी अडचणी येत आहेत. त्यामुळे येथे पूर्णवेळ व सुसज्ज रूग्णवाहिका उपलब्ध करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
डॉक्टरांची पदेही रिक्त
सध्या रूग्णालयात तीन डॉक्टर आहेत. यापैैकी प्रत्येक डॉक्टर रजेवर जातात. प्रत्येक डॉक्टर दहा दिवस सुटीवर गेल्यानंतर उपस्थित डॉक्टरांना भरती झालेल्या रूग्णांची तपासणी करून उपचार करताना अडचणी येतात. डॉक्टरांसोबत रूग्णांनाही मानसिक, शारीरिक त्रास सहन करावा लागतो. रूग्णालयातील वैैद्यकीय अधीक्षकाचे पद मागील सात-आठ महिन्यांपासून रिक्त आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून येथील कनिष्ठ लिपीक गैरहजर आहे. ओपीडीमधील सकाळ व सायंकाळचे काम होमिओपॅथी डॉक्टर सांभाळतात. राष्टÑीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत होणारी वैैद्यकीय अधिकाºयांची नियुक्ती मागील तीन वर्षांपासून झाली नाही. यामध्ये दोन महिला वैैद्यकीय अधिकारी व दोन पुरूष वैैद्यकीय अधिकाºयांचे पद रिक्त आहेत.