ग्रामीण रूग्णालयाची आरोग्यसेवा ढासळली
By Admin | Updated: October 28, 2014 22:56 IST2014-10-28T22:56:25+5:302014-10-28T22:56:25+5:30
सध्या आदिवासीबहुल कोरची तालुका साथ रोगाच्या विळख्यात सापडला आहे. या रूग्णालयात मलेरियाने ग्रस्त तालुक्यातील अनेक रूग्ण दाखल आहेत. या पार्श्वभूमीवर जि. प. सदस्य पद्माकर

ग्रामीण रूग्णालयाची आरोग्यसेवा ढासळली
गडचिरोली : सध्या आदिवासीबहुल कोरची तालुका साथ रोगाच्या विळख्यात सापडला आहे. या रूग्णालयात मलेरियाने ग्रस्त तालुक्यातील अनेक रूग्ण दाखल आहेत. या पार्श्वभूमीवर जि. प. सदस्य पद्माकर मानकर यांनी मंगळवारी रूग्णालयाला भेट देऊन पाहणी केली. या भेटीप्रसंगी कोरचीच्या ग्रामीण रूग्णालयात अनेक समस्या निर्माण झाले असल्याचे दिसून आले.
भेटीप्रसंगी रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. गणेशकर, परिचारिका उंदीरवाडे, कर्मचारी राजू सोनार आदी उपस्थित होते. यांच्या व्यतिरिक्त अन्य सर्व कर्मचारी गैरहजर आढळून आले, अशी माहिती जि. प. सदस्य पद्माकर मानकर यांनी दिली आहे. या रूग्णालयात मलेरियाचे १० रूग्ण भरती असून अन्य दाखल रूग्णांची संख्याही मोठी आहे. मात्र एकच वैद्यकीय अधिकारी उपचार करीत असल्याचे यावेळी निदर्शनास आले, असेही मानकर यांनी म्हटले आहे. या रूग्णालयातील भोजन व्यवस्था बंद करण्यात आली असून येथील रूग्णांना गेल्या १० दिवसापासून भोजन मिळत नसल्याचे यावेळी दिसून आले, असेही मानकर यांनी म्हटले आहे. बेडशिट तसेच अंथरूण, पांघरूणची व्यवस्था नाही, अनेक पदे रिक्त आहेत. त्यामुळे याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी आहे.