शहरं
Join us  
Trending Stories
1
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
2
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
3
पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन?
4
Shubham Dubey : सरकारी नोकरीत रिजेक्टचा ठपका; मग एका रात्रीत 'करोडपती' होऊन तो IPL स्टार कसा बनला?
5
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
6
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
7
भ्रष्टाचाराची तक्रार केली, ग्राम प्रमुखाला जेव्हा कळलं तेव्हा झाला 'मोठ्ठा कांड'! काय घडलं?
8
Travel Tips: फिरण्याची आवड आहे पण खिशाला परवडत नाही? जगभ्रमंतीची 'अशी' फिटवा हौस 
9
Sandeepa Virk : "दिग्दर्शक रात्री खोलीत शिरला, केली घाणेरडी मागणी"; अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव
10
IMDb Play Trick: सावधान! IMDb वर मोफत चित्रपट पाहण्याचा 'हा' जुगाड पडू शकतो महागात!
11
"दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक
12
विराटच्या खांद्याला खांदा लावून वर्ल्डकप जिंकला, आता IPL 2026 मध्ये करतोय पंचगिरी, कोण आहे 'हा' खेळाडू?
13
Top Marathi News LIVE Updates: 'मविआ'कडून अंबादास दानवे विधान परिषदेचे उमेदवार- आदित्य ठाकरे
14
३३ व्या वाढदिवसाचा भयंकर स्टंट! गोरेगावमध्ये पेट्रोल ओतून रस्ता पेटवला; रील स्टारला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
15
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
16
"संजय राऊत, अशी मुक्ताफळं उधळताना तुम्हाला लाज वाटली नाही का..?"; भाजप नेत्याचा खरमरीत सवाल
17
सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
18
नवरदेव झिंगत डुलत आला, कारमधून उतरताना लटपटला, संतप्त वधूने तिथेच लग्न मोडले
19
आलिशान गाडी अन् ५५ लाख, 'मॅडम कलेक्टर'चा पर्दाफाश; नोकरीच्या नावाखाली तरुणांना फसवलं
20
Watermelon Price: मुंबईतील 'त्या' घटनेनंतर कलिंगडाचे दर कोसळले, आता किती रुपयांना मिळतंय?
Daily Top 2Weekly Top 5

पथदिव्यांच्या वीजबिलाचे 33 काेटी रुपये थकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 05:00 IST

वर्षभरात किती विजेचा वापर झाला, याची माहिती ग्रामपंचायत पंचायत समितीला सादर करते. पुढे ही माहिती जिल्हा परिषदेमार्फत राज्य शासनाकडे पाठविली जाते. मागील वर्षभरात अनेक ग्रामपंचायतीचे वीजबिल भरण्यात आले नाही. त्यामुळे गडचिराेली जिल्ह्यातील पथदिव्यांची थकबाकी सुमारे ३३ काेटी १४ लाख रुपयांपर्यंत पाेहाेचली आहे. 

ठळक मुद्देवर्षभर कराचा भरणाच नाही; ग्रामपंचायतींना महावितरणने धाडल्या नाेटीस

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : ग्रामपंचायत, नगर परिषदा व नगर पंचायतींकडे पथदिव्यांच्या वीजबिलाचे सुमारे ३३ काेटी १४ लाख रुपये थकले आहेत. मार्चअखेरच्या पार्श्वभूमीवर महावितरणने वसुली अभियान सुरू केले असून, थकीत वीजधारकांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरू केली आहे. याचा फटका पथदिव्यांनाही बसण्याची शक्यता आहे. ग्रामपंचायतीचे आर्थिक उत्पन्न अतिशय मर्यादित असल्याने या उत्पन्नातून पथदिव्यांचे वीजबिल भरणे ग्रामपंचायतीला शक्य हाेत नाही. त्यामुळे पथदिव्यांचे वीजबिल भरण्याची जबाबदारी यापूर्वी जिल्हा परिषदेकडे हाेती. आता ही जबाबदारी राज्य शासनाकडे साेपविण्यात आली आहे. वर्षभरात किती विजेचा वापर झाला, याची माहिती ग्रामपंचायत पंचायत समितीला सादर करते. पुढे ही माहिती जिल्हा परिषदेमार्फत राज्य शासनाकडे पाठविली जाते. मागील वर्षभरात अनेक ग्रामपंचायतीचे वीजबिल भरण्यात आले नाही. त्यामुळे गडचिराेली जिल्ह्यातील पथदिव्यांची थकबाकी सुमारे ३३ काेटी १४ लाख रुपयांपर्यंत पाेहाेचली आहे. आर्थिक वर्ष संपण्याच्या पूर्वी जास्तीत जास्त वीजबिलाची वसुली व्हावी, यासाठी महावितरणने माेहीम सुरू केली आहे. या अंतर्गत थकबाकीदार ग्राहकांना नाेटीस पाठविल्या जात आहेत. मार्च महिन्याच्या पूर्वी वीजबिलाचा भरणा न झाल्यास वीजपुरवठा खंडित करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासन कामाला लागून वीज वापराची माहिती पंचायत समितीकडे सादर करीत आहेत. त्यामुळे प्रत्यक्षात वीज बिल मिळण्यासाठी आणखी काही महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.

महावितरणचेही चुकले

घरगुती, वाणिज्य व औद्याेगिक ग्राहकांना दर महिन्याला वीजबिल पाठविले जाते. मात्र पथदिव्यांचे वीजबिल ग्रामपंचायतीला दर महिन्याला दिले जात नाही. त्यामुळे वर्षभर ग्रामपंचायत प्रशासनही वीजबिल भरण्याची प्रक्रिया करण्याकडे दुर्लक्ष करते. मार्च महिन्याच्या शेवटी महावितरणकडून नाेटीस पाठविली जाते. त्यानंतर वीजबिल भरण्याची प्रक्रिया सुरू हाेते. मात्र ही प्रक्रिया अतिशय लांब असल्याने मार्च महिन्याच्या पूर्वी वीजबिल भरले जात नाही. 

वीजबिल वसुलीतून प्राप्त हाेणाऱ्या एकूण महसुलापैकी ८५ टक्के महसूल केवळ वीज खरेदीवर खर्च हाेते. उर्वरित रक्कम प्रशासन व इतर बाबींवर खर्च हाेते. महावितरण प्रथम वीजपुरवठा करते. नंतर वीजबिल देते. इतर सेवांमध्ये मात्र प्रथम पैसे माेजावे लागतात. नंतरच सेवा मिळते. याचा विचार करून नागरिकांनी वीजबिल भरणे आवश्यक आहे. वीजबिल वसुलीची माेहीम महावितरणने सुरू केली आहे. काेणत्याही प्रकारच्या ग्राहकाकडे वीजबिल थकले असल्यास वीजपुरवठा खंडित केला जाईल. - सुनील देशपांडे, मुख्य अभियंता, चंद्रपूर परिमंडळ

चंद्रपूरपेक्षा गडचिराेलीचे दुप्पट वीजबिल थकलेचंद्रपूर जिल्ह्याची लाेकसंख्या गडचिराेली जिल्ह्यापेक्षा अधिक आहे. तसेच गावे माेठी असल्याने पथदिव्यांसाठी वापरही अधिक हाेते. मात्र चंद्रपूर जिल्ह्याची पथदिव्यांची थकबाकी केवळ १९ काेटी ४९ लाख रुपये एवढी आहे, तर गडचिराेली जिल्ह्याची थकबाकी ३३ काेटी १४ लाख रुपये एवढी आहे. यावरून गडचिराेली जिल्ह्यातील ग्रामपंचायतीने वर्षभर किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीचे वीजबिल भरले नसल्याचे स्पष्ट हाेत आहे.

 

टॅग्स :electricityवीजbillबिल