२५ कोटीच्या निधीने वन समित्या होणार मालामाल
By Admin | Updated: November 20, 2015 02:00 IST2015-11-20T02:00:05+5:302015-11-20T02:00:05+5:30
वन व्यवस्थापन समितीच्या सदस्यांना विविध वस्तूंचे वितरण करण्यासाठी वन विभागाच्या वतीने २५ कोटी रूपयांचा निधी २०१५-१६ या वर्षात उपलब्ध करून दिला जाणार आहे.

२५ कोटीच्या निधीने वन समित्या होणार मालामाल
गडचिरोली : वन व्यवस्थापन समितीच्या सदस्यांना विविध वस्तूंचे वितरण करण्यासाठी वन विभागाच्या वतीने २५ कोटी रूपयांचा निधी २०१५-१६ या वर्षात उपलब्ध करून दिला जाणार आहे. सदर योजनेचा लाभ अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना दिला जाणार आहे.
संरक्षित वनाच्या लगत क्षेत्रातील गावामधील अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना गॅसचा पुरवठा करण्याच्या उद्देशाने २०१४-१५ या आर्थिक वर्षात २ हजार लाख रूपयांचा निधी मंजूर करून अर्थसंकल्पीत करण्यात आला होता. ३१ मार्च २०१५ च्या शासन निर्णयानुसार १ हजार ५०० लाख रूपयांचा निधी अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक नागपूर यांना वितरित व खर्च करण्यास मान्यता प्रदान करण्यात आली होती. आदिवासी विकास विभागाने १ हजार ७५० लाख रूपयांचा निधी वन विभागाला सुपूर्द केला आहे. यातून अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना कुकिंग गॅस, बायोगॅस, दुभत्या जनावरांसाठी अनुदान, वृक्ष लावगडीसाठी संकल्पीत केलेल्या निधीपैकी ७० टक्के मर्यादित निधीचे वितरण केले जाणार आहे. या निधीतून साहित्याचे वितरण करताना जुन्या लाभार्थ्यांना प्रथम प्राधान्य दिले जाणार आहे. एलपीजी गॅससाठी २५ टक्के व बायोगॅससाठी २५ टक्के हिस्सा दिल्यानंतर अनुदानाची रक्कम वन व्यवस्थापन समितीला मिळेल.