पथदिव्यांचे १३४ काेटी रुपये वीजबिल थकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:33 IST2021-07-26T04:33:27+5:302021-07-26T04:33:27+5:30

बाॅक्स ..... घरगुती ग्राहकांकडे १५ काेटी थकले - गडचिराेली जिल्ह्यात २ लाख ६ हजार ७७३ घरगुती वीजग्राहक आहेत. या ...

Rs 134 crore electricity bill for street lights | पथदिव्यांचे १३४ काेटी रुपये वीजबिल थकले

पथदिव्यांचे १३४ काेटी रुपये वीजबिल थकले

बाॅक्स .....

घरगुती ग्राहकांकडे १५ काेटी थकले

- गडचिराेली जिल्ह्यात २ लाख ६ हजार ७७३ घरगुती वीजग्राहक आहेत. या ग्राहकांकडून महिन्याला जवळपास १३ काेटी रुपयांची वीज खर्च केली जाते. काेराेनाच्या कालावधीत काही नागरिकांनी वीजबिलाचा भरणा केला नाही. सुमारे १४ काेटी ५७ लाख रुपयांचे वीजबिल या ग्राहकांकडे थकले आहे.

- व्यावसायिक ग्राहकांकडे २ काेटी ५० लाख, औद्याेगिक ग्राहकांकडे २ काेटी २९ लाख, सार्वजनिक सेवेच्या ग्राहकांकडे ३ काेटी ८७ लाख रुपयांची रक्कम थकली आहे. सर्व मिळून जवळपास २५ काेटी रुपयांची रक्कम थकली असल्याने महावितरण आर्थिक अडचणीत आली आहे.

बाॅक्स ......

वीजपुरवठा खंडित करण्याची माेहीम सुरू

ज्या घरगुती, व्यावसायिक, औद्याेगिक ग्राहकांनी मागील तीन ते चार महिन्यांपासून वीजबिलाचा भरणा केला नाही, अशा ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याची माेहीम महावितरणने हाती घेतली आहे. काही ग्रामपंचायतींचाही वीजपुरवठा खंडित करण्याचा इशारा महावितरणने दिला आहे.

बाॅक्स .....

शासनाने मागितली पथदिव्यांची बिले

राज्य शासनाने मे महिन्यात काढलेल्या परिपत्रकानुसार पथदिव्यांचे वीजबिल १५व्या वित्त आयाेगाच्या निधीतून भरायचे हाेते. मात्र काही ग्रामपंचायतींना १५व्या वित्त आयाेगातून मिळणाऱ्या अनुदानापेक्षाही वीजबिलाची रक्कम अधिक हाेती. तसेच संपूर्ण रक्कम वीजबिलावरच खर्च झाल्यास उर्वरित कामांसाठी ग्रामपंचायतीकडे अनुदानच राहणार नाही, ही बाब शासनाच्या लक्षात आली. शासनाने पुन्हा पंचायत समितींमार्फत वीजबिले मागण्यास सुरुवात केली.

काेट ....

थकीत वीजबिलामुळे महावितरण आर्थिक अडचणीत आली आहे. त्यामुळे नाइलाजास्तव ज्या नागरिकांचे वीजबिल थकीत आहे त्यांचा वीजपुरवठा खंडित केला जात आहे. वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई टाळण्यासाठी नागरिकांनी वीजबिल भरावे.

- गाडगे, अधीक्षक अभियंता, गडचिराेली

बाॅक्स ...

तालुकानिहाय थकीत वीजबिल

तालुका थकीत रक्कम

अहेरी १९.१४

भामरागड १.८३

चामाेर्शी १३.५८

एटापल्ली ३.६०

मुलचेरा ७.७०

सिराेंचा २६.८३

आरमाेरी १५.७३

धानाेरा ११.२४

गडचिराेली ३.८३

काेरची ५.२८

कुरखेडा १७.९०

देसाईगंज ७.६५

एकूण १३४.३१

Web Title: Rs 134 crore electricity bill for street lights

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.